तुंगतच्या बंद टोलनाक्यावर थांबून अवैध दारू विक्री
पेनूरच्या धनाजी चव्हाण विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचार बंदीचा अंमल सुरु असताना व जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व व्यवसाय बंद असताना पंढरपूर तालुक्यात माञ अनेक ठिकाणी देशी,विदेशी तसेच हातभट्टीच्या दारूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे पंढरपूर पोलीस उपविभागा अंतर्गत असलेल्या पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत उघड झाले आहे.संचार बंदीची अमलबजावणी करीत असतानाच अवैध दारू विक्री रोखण्यासाठीही पोलीस कारवाया करीत असल्याचे दिसून येते.
पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे बंद असलेल्या टोलनाक्याच्या ठिकाणी थांबून पेनूर येथील इसम धनाजी चव्हाण हा अवैध रित्या विदेशी दारू विक्री करीत असल्याची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या आदेशानुसार स. पो.उपनिरीक्षक ए.एन.जाधव, पो.कॉ. विशाल भोसले,पो.हे.कॉ.वामन यलमार यांनी केलेल्या कारवाईत )1200/-रु.किंमतीच्या मँकडल नं-1 विस्की कंपनीच्या 180 मि.ली.च्या प्रत्येकी किंमत 150रु. असलेल्या 8 सिलबंद बाटल्या 2)1250/- 10रु.दराच्या 35नोटा,20 रु.दराच्या 5 नोटा,50 रु.दराच्या 16नोटा असा एकूण मुद्देमाल 2450/- जप्त करण्यात आला आहे. विरुद्ध भा.द.वि.क.188,269,270सह मुं.दारुबंदी कलम-65(ई),महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम-37(3)/135 आपत्ती व्यवस्थापन 2005चे कलम-51(2),साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम 1897 चे कलम-2,3 प्रमाणे तसेचCRPC-144अन्वये संचारबंदी आदेशाचे उलंघन केले म्हणुन धनाजी मारुती चव्हाण वय 30वर्षे रा. पेनुर ता.मोहोळ याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.