सरकोली येथे अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस नाईक ताटे यांना दमदाटी

सरकोली येथे अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस नाईक ताटे यांना दमदाटी

पंढरपूर तालुका पोलिसांच्या कारवाईत ट्रॅक्टरसह तीन वाहने ताब्यात 
सरकोलीचे तलाठी व मंडल अधिकारी यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह 

पंढरपूर तालुक्यातील सरकोली हे अवैध वाळू उपशामुळे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले असून आठच दिवसापूर्वी या ठिकाणी झालेल्या पोलीस कारवाईत टिपर व वाळू उपसा करण्यासाठी लागणाऱ्या यारीसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.अशातच आ. भारत भालके यांनी दोनच दिवसापूर्वी बोलताना सरकोली येथून अवैध वाळू उपसा होत असून आपण या बाबत कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी बोललो असल्याचे सांगितले होते.तर सरकोलीचे मा.सरपंच  पांडुरंग भोसले यांनी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशाबाबत अनेकवेळा तक्रार केली होती.
  उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे व तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांचे मार्गदर्शनाखाली आज सरकोली येथे  आज झालेल्या कारवाईत 1) सचिन शंकर जाधव वय-35 वर्षे रा. पुळुज ता. पंढरपुर 2) श्रीकृष्ण बाबासो कोळी वय-23 वर्षे रा. शंकरगांव ता. पंढरपुर 3) कामाजी लिंगदेव वाघमोडे रा. पुळुज ता. पंढरपुर यांनी व वरील तीन ही ट्रक्टरचे मालक यांनी आपसात संगणमत करून ट्रक्टर व डंपीग ट्रेलर मधुन मौजे सरकोली येथील बंधा-याजवळ भिमानदीचे पात्रातुन संध्या कोरोना विषाणुचे संक्रमण सुरु असताना लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने मनाई आदेशाचे उल्लघन करुन, जिल्हाधिकारी सोलापुर यांचे संचार बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले व पर्यावणाचा -हास होईल हे माहित असताना स्वताचे आर्थिक फायद्यासाठी शासनाचे परवानगी शिवाय अवैध रित्या वाळु उपसा करुन शासनाची गौण खनिज्याची चोरी करीत असताना मिळुन आला तसेच कर्तव्य बजावत असताना सरकारी कामात अडथळा केला आहे आणि शिवीगाळ करुन तुम्ही ट्रक्टर कसा घेवुन जाता ते बघुन घेतो अशी धमकी देवुन ट्रक्टरची चावी काढुन घेवुन नदीपात्रालगत असलेल्या ऊसात पळुन गेला. म्हणुन त्यांच्या विरुद्ध भा.द.वि. 353,379,186,188,189,34 पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9,15 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम- 51 (B) प्रमाणे गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत फिर्यादी पो.ना.बापुसाहेब किसनराव मोरे यांच्यासह सहा. पो.निरीक्षक माने ,पो.हे.कॉ. पवार व पो. ना. ताटे ,चा.पो.क वाघमारे यांनी भाग घेतला.तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या धाडसी कारवाई बद्दल सरकोली परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

13 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago