पोलीस तर कारवाई करीत आहेत मग आ. भालके यांचा इशारा कुणासाठी ?

पोलीस तर कारवाई करीत आहेत मग आ. भालके यांचा इशारा कुणासाठी ?

महसूल व उत्पादन शुल्क विभाग दखल घेणार ? 

पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांनी आज एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना पंढरपूर तालुक्यातील संचार बंदीच्या काळातही अवैध वाळू उपसा व अवैध दारू विक्री सुरूच असल्याने नाराजी व्यक्त केली असून एकीकडे बहुतांश सामान्य नागिरक शासनाचा संचार बंदीचा आदेश पाळत घरात बंदिस्त झाले असताना तालुक्यात नदीकाठच्या परिसरात अवैध वाळू उपसा कसा काय सुरु आहे ? अवैध दारू विक्री कशी काय सुरु आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे.व या बाबत आपण जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकारी यांच्याशी देखील बोललो असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे पंढरपूर तालुक्यात सुरु असलेला अवैध वाळू उपसा व अवैध दारू विक्री हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

        गेल्या वीस दिवसात पंढरपूर पोलीस उपअधीक्षक कार्यालयांतर्गत असलेल्या पंढरपूर शहर,पंढरपूर तालुका,पंढरपूर ग्रामीण व करकंब पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली  दिवसभर संचार बंदीचा अंमल कठोरपणे झाला पाहिजे यासाठी कर्तव्य बजावले असताना रात्रीच्या वेळी पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावातील अवैध वाळू उपशावर केलेल्या कारवाईची आकडेवारी तपासून पाहता दरदिवशी सरासरी २ ठिकाणी तरी कारवाई केलेली दिसून येते.त्याच बरोबर महाराष्ट्र दारू बंदी अधिनियमाच्या कलम ६५ (ई) अंतर्गत केलेल्या कारवायांची संख्याही खूप मोठी आहे.आणि कदाचित पंढरपूर पोलीस उपविभागाने गेल्या २० दिवसातील कारवाईची आकडेवारी आ. भारत भालके यांच्यासमोर ठेवली नसावी.पण याच कालावधीत अगदी कौठाळी सारख्या गावात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा प्रकारही घडला आहे.अतिशय तोकड्या मनुष्यबळावर पोलीस प्रशासन हे गावोगावच्या अवैध वाळू उपशावर कारवाई करीत असताना ज्या गावाच्या हद्दीत सदर कारवाया झाल्या आहेत तेथे महसूल विभागाचे निवासी कर्मचारी असलेल्या तलाठी व पोलीस पाटील व त्यांच्यावर नियंत्रण असलेल्या मंडळ अधीकारी यांनी याच वीस दिवसाच्या अवैध वाळू उपशावर कारवाई केल्याचे आढळून येत नाही आणि जर कारवाई केलीच असेल तर ते प्रमाण पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवायांच्या मानाने अतिशय नगण्य आहे. आ. भारत भालके यांनी यावेळी बोलताना अवैध दारू विक्रीचाही मुद्दा उपस्थित केला असून अवैध अथवा विनापरवाना दारू विक्री बाबत ठोस कारवाई करण्याचे जेव्हडे अधिकार उत्पादन शुल्क विभागाला आहेत तेवढे पोलिसाना नाहीत हे वास्तव आहे.गेल्या वीस दिवसातच काय तर गेल्या अगदी दोन महिन्याच्या कालावधीत पंढरपूर उत्पादन शुल्क विभागाने पंढरपूर शहरात व तालुक्यात अवैध दारू विक्री रोखण्यासाठी  कारवाई केली असल्याची अधिकृत माहिती आमच्याकडे नाही.सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या जवळपास वर्षभरात या पोलीस उपविभागा अंतर्गत अवैध वाळू उपसा करणारी शेकडो वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली, याच्या बातम्याही प्रसिद्धी माध्यमातून प्रकाशित झाल्या पण यापैकी अनेक वाहनांवर महसूल विभागाने दंडात्मक कारवाई केली असती तर कोट्यवधी रुपयांचा महसूल विभागास प्राप्त झाला असता पण हि वाहने पुढे संबंधित वाहन मालकांनी कोर्टातून केवळ जुजबी दंड भरून सोडवून घेतल्याचे आढळून येईल.पण अशा प्रकरणात महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे शासनाचे मात्र कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येते.  

   एकीकडे शहर तालुक्यातील अपुरे संख्याबळ असतानाही पोलीस कर्मचारी जिल्हाधिकारी सोलापूर यांनी लागू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम १८८ अनुसार कारवाया करून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच याच कर्मचाऱ्यांना अवैध वाळू उपसा, अवैध वाळू चोरी, जुगार अड्डे यांच्यावरही कारवाई करण्यासाठी पेट्रोलींग करावे लागत आहे.त्यामुळे अशा अवैध वाळू चोरी,अवैध व बनावट दारू विक्री बाबत कारवाईचा भार अशा संकटकाळात पोलीस प्रशासन समर्थपणे पेलत आहे याचे कौतूक आमदार भारत भालके यांनी करणे अपेक्षित होते.आणि या साठी पंढरपूर पोलीस उपविभागही तेवढाच जबाबदार असून त्यांनी गेल्या वीस दिवसातील अवैध वाळू उपसा व अवैध दारू विक्री यावर  पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती लोकप्रतिनिधी या नात्याने आ. भारत भालके यांना दिली नसावी.  

     आ.भारत भालके यांच्या या अवैध वाळू उपसा व अवैध दारू विक्री बाबतच्या या प्रतिक्रियेनंतर तरी आता महसूलचे जबाबदार कर्मचारी व अधिकारी अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी व पंढरपूर उप्तादन शुल्क विभागाचे जगताप त्यांची सहकारी पुढे येतील व पोलिसांनाच ताण हलका करतील हि अपेक्षा सर्वसामान्य नागिरक व्यक्त करीत आहेत. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago