घातक रसायनांचा वापर करून बनावट विदेशी दारू विक्री होत असल्यास अन्न विभाग करणार कठोर कारवाई !

घातक रसायनांचा वापर करून बनावट विदेशी दारू विक्री होत असल्यास अन्न विभाग करणार कठोर कारवाई !

प्रदीप राऊत( सह.आयुक्त अन्न विभाग सोलापूर) यांचा इशारा

पोलीस प्रशासन दारूबंदी कायदा १९६५ (ई) नुसार कारवाई करत असताना उत्पादन शुल्क विभाग मात्र सुस्तच

सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर जिल्हाधिकारी सोलापूर यांनी अत्यावश्यक आस्थापना सोडून इतर व्यवसायासह देशी-विदेशी मद्य विक्री व परमिट रूम बंद करण्याचा निर्णय शुक्रवार दिनांक २० मार्च रोजी जाहीर केला.मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत जिल्ह्यात हा आदेश लागू होण्यापूर्वीही व नंतरही पंढरपूर शहर व तालुक्यात विदेशी बनावटीचे देशी मध्य, देशी दारू तसेच हातभट्टी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे पंढरपूर शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे,पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे व करकंब पोलीस ठाणे यांनी केलेल्या कारवायात उघड झाले आहे.सुरुवातीचा काही काळ वगळता स्टॉक संपल्यानंतर अनेक अवैध दारू विक्रेत्यांकडून बनावट सीलबंद दारूची विक्री होत असल्याची तक्रार ”रोजचा अनुभव” असलेले तळीराम खाजगीत करीत आहेत.मानवी जीवितास अपायकारक सीलबंद दारू विक्री होत असेल तर कारवाईचे अधिकारी अन्न विभागास असून या बाबत अधिक माहिती घेण्यासाठी सोलापूरचे सह.आयुक्त प्रदीप राऊत (अन्न विभाग) यांच्याशी संपर्क केला असता वस्तुतः हातभट्टी दारू अथवा मद्य उत्पादनाच्या अवैध विक्री बाबत कारवाईचे अधिकार उत्पादन शुल्क विभागास व पोलीस प्रशासनास आहेत मात्र बनावट दारू तयार करून ती मान्यताप्राप्त ब्रँडचे नावे सीलबंद करून विकली जात असेल तर अन्न विभाग या बाबत ठोस कारवाई करेल तसेच पोलीस प्रशासनाने जप्त केलेल्या देशी दारूच्या बॉटल्सचे सॅम्पल्स घेतले जातील अशी माहिती प्रदीप राऊत यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली आहे.  

      देशी तसेच विदेशी बनावटीच्या देशी दारूची अवैधरित्या विक्री करणाऱ्याकडील साठा जवळपास संपुष्टात आल्यामुळे हे विक्रेते बनावट दारू विक्री करण्याची शक्यता बळावली आहे.या बनावट दारूत स्पिरिट सारख्या मानवी शरीरास घातक ठरणाऱ्या रसायनांचा वापर होत असल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे.त्यामुळेच शासनाने अशा सीलबंद बनावट दारू बाबत कारवाईचे अधिकार अन्न विभागासही दिले आहेत.सद्याच्या ड्राय डे च्या काळात मोठ्या प्रमाणात बनावट सीलबंद दारूची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्याने अन्न विभाग सतर्क झाला असून आता या बाबत कठोर कारवाईचे पावले उचलणार असल्याचे सह.आयुक्त प्रदीप राऊत यांनी पंढरी वार्ताशी बोलताना सांगितले. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 week ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

2 weeks ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

2 weeks ago