संचार बंदीच्या काळातही शेगाव दुमाला येथून टिप्परद्वारे वाळू उपसा सुरुच
तालुका पोलिसांच्या कारवाईत गंभीर प्रकार उघड
देशभरात संचार बंदीचा अंमल सुरु असताना व अनेक दुकानदार आपला पोटापाण्याचा व्यवसाय बंद ठेवून घरात निवांत बसलेले असतानाच पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू उपसा सुरूच असल्याचे पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाले आहे.या गंभीर प्रकाराची दखल महसूल प्रशासन घेणार का असाच प्रश्न आता सामान्य जनतेमधून व्यक्त केला जात आहे.
या बाबत पो. कॉ.सोमनाथ नरळे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी नुसार दिं.26/03/2020 रोजी रात्री 10/00 वाजण्याचे सुमारास फिर्यादी नरळे व पो.हे.क. क्षिरसागर , पो.हे.क बन्ने , पो. ना.माळी यांना मिळालेल्या माहिती नुसार संजित बंडु शेवाळे रा. गुरसाळे ता. पंढरपुर याने त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीचे हायवा नं.MH-11-AL -4533 यामधुन शेगावदुमाला हद्दीतील भिमा नदीच्या पात्रातुन वाळु भरुन घेऊन जात आहे .असे खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर तालुका पोलीस मोटार सायकलवरुन मौजे शेगावदुमाला या गावाजवळील यल्लमा देविच्या मंदीराजवळ गेले असता भिमा नदीच्या पात्राकडुन टाटा कंपनीचे हायवा टिपर नं.MH-11-AL -4533 येत असताना दिसला .सदर गाडीचे चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव संजित बंडु शेवाळे रा. गुरसाळे ता. पंढरपुर असे असल्याचे निष्पन्न झाले.सदर टिपर मध्ये ४ ब्रास वाळूची अवैध उपसा करून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
या कारवाईत )5,00,000/- रुपये किंमचतीचे टाटा कंपनीचे हायवा गाडी MH-11-AL -4533 , 16,000/- रुपये किंमतीचे वरील वाहनाचे हौदात अंदाजे 04 ब्रास वाळु असा एकूण 5,16,000/- जप्त करण्यात आला असून आरोपी संजित बंडु शेवाळे रा. गुरसाळे ता. पंढरपुर याच्या विरोधात भा.द.वि.कलम 379व पर्यावरण कायदा कलम 9 व 15 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.