38 फाट्याला कॅनॉल द्वारे त्वरित पाणी सोडा नारायण चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांची मागणी
संचार बंदी आदेश मोडून करावी लागत आहे पाण्यासाठी पायपीट
पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली परिसरातील विहीर व बोर ची पाण्याची पातळी खालावली असून या परिसरातील पिके पाण्यावाचून धोक्यात आली आहेत ही पिके वाचवण्यासाठी उजनीच्या डाव्या कालव्यातून 38 फाट्याला त्वरित पाणी सोडण्याची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे त्वरित पाणी सोडा अशी मागणी नारायण चिंचोली भैरवनाथ वाडी देगाव आढिव ईश्वर वठार परिसरातील नागरिकांमधून होत आहे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून सध्या डाव्या व उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले जात आहे हे पाणी कॅनल द्वारे वीस ते बावीस दिवस सुरु असून 38 फाट्याला पाणी कधी मिळणार याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत मात्र उजनी कॅनल च्या ढिसाळ नियोजनामुळे या परिसरातील शेतकऱ्या वरती कृत्रिम संकट निर्माण होणार आहे असे चित्र निर्माण झाले आहे या परिसरातील सोन्यासारखे आलेली पिके अक्षरशः जुळू लागली आहेत उजनी धरणात मुबलक पाणी साठा असूनही शेतकऱ्या वरती पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे.
रब्बी हंगामात उजनी धरणाच्या ढिसाळ नियोजनाचा प्रत्यय सोलापूर जिल्ह्याला आला होता सध्या चालू उन्हाळी पाळीतील ही नियोजन कोड मोडल्याचे पाहावयास मिळत आहे नारायण चिंचोली परिसरात पाणी पातळी पूर्णत खालावली असून अक्षरशः नारायण चिंचोली ला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी ही तळ गाठला आहे त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे या परिसरातील हातातोंडाशी आलेली पिके वाचविण्यासाठी उजनीच्या डाव्या कालव्यातून 38 फाट्याला पाणी सोडण्याची मागणी या परिसरातील नागरिक शेतकरी वर्गातून होत आहे
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…