अखेर जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतली ‘त्या’ तक्रारीची दखल ?

अखेर जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतली ‘त्या’ तक्रारीची दखल ?

सरकोली येथे महसूल प्रशासन व स्थानिक पोलीस प्रशासकडून दुर्लक्षित अवैध वाळू उपशावर कारवाई

जिल्हा पोलीस पथकाने जेसीबीसह वाहने घेतली ताब्यात 

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथून रात्रंदिवस बिनधास्तपणे वाळू उपसा केला जात आहे मात्र त्याबाबत स्थानिक पोलिसांकडे अथवा महसूल प्रशासनाकडे तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जात नाही,उलट तक्रारदारासच कुठे वाळू उपसा सुरु आहे ते दाखवा असा तगादा लावला जातो तरी जिल्हा पोलीस प्रमुखांनी या बाबत ठिकाणी सुरु असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करावी अशी तक्रार चारच दिवसापूर्वी सरकोलीचे माजी सरपंच पांडुरंग भोसले यांनी केली होती. अशीच तक्रार जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडेही केली होती.  

        सदर अवैध वाळू उपशास पाठीशी घालणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावरही कारवाई करावी अशी तक्रारही केली होती.मात्र जिल्हा पोलीस प्रमुख यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेत थेट विशेष पथक पाठवून सरकोली येथून मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई केली असल्याचे विश्वासनिय सूत्रांकडून समजते.या कारवाईत जेसीबी सह वाहने ताब्यात घेतली असून या ठिकाणी सुरु असलेल्या अवैध वाळू उपशास जबाबदार असणाऱ्या व तकार करूनही टाळाटाळ करणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावर आता महसूल प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न पांडुरंग भोसले यांनी उपस्थति केला आहे    

  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago