कोरोनाच्या पार्शवभूमीवर पंढरीतील उद्योग धंदे थंडावले
पालिकेने सक्तीची करवसुली थांबवावी शहर राष्ट्रवादीची मागणी
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे राज्यभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.त्यामुळे उद्योग धंद्यावर मंदीचे सावट आणखी गडद झाले असून व्यवसाय पूर्णतः थंडावले आहेत.एकीकडे मार्च अखेर मुळे व्यापारी,उद्योजक आर्थिक अडचणीत असतानाच पंढरपूर नगर पालिकेने सक्तीने करवसुलीचे धोरण अवलंबले आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये अतिशय नाराजी व्यक्त होत असून नगर पालिकेने हि सक्तीची करवसुली तातडीने थांबवावी अशी मागणी पंढरपूर शहर राष्ट्रवादी कॉग्रेसने नगर पालिका प्रशासनाकडे केली आहे अशी माहिती शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी दिली आहे.
या बाबत माहिती देताना सुधीर भोसले म्हणाले कि, या बाबत आम्ही प्रांताधिकारी पंढरपूर यांच्या कार्यालयातही निवेदन दिले असून या बाबत तातडीने नगर पालिका प्रशासनाने निर्णय न घेतल्यास राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.हे निवदेन देताना राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष सचिन कदम,राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा माळी,नवनाथ मोरे आदी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…