पोलीस कोठडीतील कामगारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
आंदोलकांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांसह २४ व्यक्तिविरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण पवार यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून पंढरपूर तालुका पोलिसांनी या दाखल गुन्ह्यातील आरोपीना तातडीने ताब्यात घेण्यास सुरुवात केली असतानाच मंगळवारी यातील काही आरोपी हे पोलीस लॉक अप मध्ये गजाआड केले असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते.त्या मुळे सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला होता. व अशा प्रकारे साखर कारखान्याच्या कामगारांवर प्रथमच कारवाई झाल्याची चर्चाही होताना दिसून आली.
मात्र आता या घटनेने वेगळे वळण घेतले असून सदर फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस हे. कॉ. ढवळे यांनी सुमन उर्फ अमोल दत्तात्रय रणदिवे रा.तुंगत ता.पंढरपूर , धनाजी मधुकर रणदिवे रा.तुंगत ता.पंढरपूर , सुधिर रामदास आंध रा.तुंगत ता.पंढरपूर , धनाजी जालिंदर गोडसे रा.येवती ता.मोहोळ ,व आणखी एकाच्या विरोधात सदरचे फोटो फेसबुक या सोशल मिडीयावर प्रसिध्द करुन शासकिय कामाची गोपनियता भंग केली व पोलीस ठाणेची प्रतिमा मलिन केल्याने मुंबई पोलीस कायदा कलम – 120 सहकलम 3 शासकिय गुपिते अधिनियम 1923 सह माहिती व तंत्रज्ञान कायदा – 2000 चे कलम – 72 सह भादंवि कलम – 500 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…