गोसावी वाईन शॉप शेजारी ‘ड्राय डे’ दिवशी पुन्हा अवैध दारू विक्रीचा प्रकार उघडकीस
पंढरपुर शहर पोलिसांची कारवाई
वाईन शॉप,परमिटरूम मधून होणाऱ्या ठोक दारू विक्रीवर उत्पादन शुल्क विभाग कारवाई केव्हा करणार ?
भूवैकुंठ पंढरी नगरीत दारूबंदी व्हावी यासाठी वारकरी संप्रदायातील काही महाराज मंडळी गेल्या तीस वर्षांपासून आग्रही होते.मात्र त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले.त्यानंतर काही राजकारणी मंडळींनी यासाठी पुढाकार घेतला मात्र एकीकडे दारूबंदीची मागणी आणि दुसरीकडे दारू विक्रेत्याबरोबर फोटो शूट करून तोही निकालात निघाला. या साऱ्या घडामोडीमुळे निदान उत्पादन शुल्क विभागाच्या काटेकोर नियमाचे पालन तरी शहरातील वाईन शॉप विक्रेते,देशी दारू विक्रेते व परमिटरूम चालक करतील अशी जुजबी अपेक्षा या शहरातील नागरिक करीत असतानाच शहरातील काही वाईन शॉप तसेच,देशी दारू विक्रीची दुकाने व परमिटरूम या ठिकाणी ठोक स्वरूपात देशी विदेशी दारू विक्री केली जात असल्याचे दिसून येते.अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा दंडाधिकारी अनेकवेळा ड्राय डे घोषित करतात मात्र अशावेळी जवळपास दुपट्ट दराने देशी विदेशी दारू विक्री करणारे सक्रिय होतात. खरे तर या बाबत उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करणे अपेक्षित असताना हा विभाग डोळेझाक करीत असून गेल्या अनेक वर्षात ड्राय डे दिवशी उत्पादन शुल्क विभागाने पंढरपुरात कारवाई केल्याचे एकही उदाहरण नाही त्याच वेळी पोलीस खात्याने मात्र काल पंढरपुरात पुन्हा एकदा कारवाई केली असल्याचे दिसून आले आहे.
हे पोलीस निरिक्षक अरुण पवार यांच्या सूचनेनुसार कारवाईसाठी पेट्रोलिंग करीत असताना केलेल्या कारवाई नुसार पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रसाद औटी यांनी दाखल केलेल्या फिर्यादी नुसार सपोनि गायकवाड, पो. हे. क.ढेरे , पो. ना. राजगे पो. ना. कांबळे हे पेट्रोलींग करीत करीत गोसावी वाईन शॉप येथे आलो असता गोसावी वाईनचे मागील बोळात चोरुन देशी दारुची विक्री करीत आहे माहीती मिळाल्याने त्या ठिकाणी गेले असता तेथे बेकायदेशीररित्या दारू विक्री होत असल्याचे दिसून आले पिशवी तपासुन पाहाणी करता 312/- रु.किंमतीच्या देशी टँगो पंच कंपनीचे प्रत्येकी 180 मि.ली. च्या 06सिलबंद काचेच्या बाटल्या आढळून आल्या. सदर मुद्देमाल जप्त करुन त्या महा. प्रोव्ही. अँक्ट.कलम 65 (ई) प्रमाणे सरकार तर्फे कायदेशीर फिर्याद दिली दाखल करण्यात आली आहे.