कथित ‘सिंघमच्या’ काळात सारे अवैध धंदे सुरळीत सुरु होते -आ. भारत भालके
‘त्या’ बदली प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही,पोसलेल्या समाजसेवकांकडून अपप्रचार !
पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून दयानंद गावडे यांची कारकीर्द भलतीच चर्चेत आली होती एकीकडे शहरात सर्वच अवैध धंदे सुरळीत सुरु असल्याचे या शहरातील नागिरक उघड्या डोळ्यांनी पहात होते त्याच वेळी सामान्य गुन्हेगारावरील छोट्या मोठ्या कारवाईच्या प्रसिद्धीचे सारे सोप्सस्कार पार पाडून सिंघम अशी प्रतिमा जाणीवपूर्वक निर्माण केली जात आहे अशीही चर्चा या शहरातील सुजाण नागिरक खाजगीत बोलताना व्यक्त करीत होते मात्र आता आमदार भालके यांनीच या प्रकरणी थेट खुलासा केल्याने या चर्चेस पुन्हा उधाण आले असून पोलीस निरिक्षक गावडे यांच्या कारकिर्दीत या शहरात दबलेल्या अनेक प्रकरणाची दबक्या आवाजात बदलीनंतर चर्चा होत असतानाच आ. भारत भालके यांनी थेट आरोप केल्याने या चर्चेस आता पुन्हा बळ मिळाले आहे.
रविवार दिनांक ८ मार्च रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या बदलीचा आदेश आला आणि त्याच बरोबर प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून अरुण पवार यांनी याच दिवशी पदभार स्वीकारला.आणि शहरात जोरदार चर्चा सुरु झाली.पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी आपल्या कारकिर्दीत या शहरातील विविध महाविद्यालये आणि शाळा यांच्या व्यस्थापनाशी संपर्क करीत या ठिकाणी होणारे छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी यंत्रणा राबविली होती.त्या मुळेच ते विदयार्थी वर्गात फेमस झाले होते.मात्र याच वेळी अनेकांना ” वेगळा’ अनुभव” आल्याची चर्चाही शहरात दबक्या आवाजात होत होती. आणि आज आमदार भारत भालके यांनी केलेल्या खुलाशासह मांडलेल्या विविध मुद्द्यांमुळे विस्मृतीत जाऊ लागलेला हा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला आहे.
आ. भारत भालके यांनी खुलाशानुसार,पंढरपूर शहर पी.आय.च्या बदलीचा खुलासा काही लोक मागत आहेत, काही विद्यार्थिनींचाही गैरसमज करून देत एका प्रशासकीय बदलीस जातीचा रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या कथित सिंघमच्या बदलीवरून हे सुरू आहे, त्या सिंघमच्या काळातच पंढरपूर शहरात वाळू, अवैध दारू, गांजा, जुगार, मटका असे प्रकार वाढीस लागले, त्यांच्याच काळात पिस्तुल दाखवून धमकवणे, विवाहितेचे अपहरण करण्यापर्यंत कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली होती. त्यामुळे सामान्य जनतेला सिंघमच्या बदलिचे दुःख नाही तर त्यांनी पोसलेल्या विकाऊ समाज सेवकांना कळवळा आलेला आहे असा आरोप आम भारत भालके यांनी केला.
शहर पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या बदलीवरून सध्या पंढरीत उलट सुलट चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरून पोस्ट बाजी सुरू आहे तर काही विद्यार्थ्यांनीना पत्रकारासमोर आणून त्यांच्याकडून बदलीचा खुलासा मागितला जात आहे. या पार्श्वभूमीवर आम भालके यांनी बुधवारी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात, त्या विद्यार्थी भगिनींचा गैरसमज होऊ नये म्हणून मी हा खुलासा करीत असल्याचे म्हटले आहे.
यासंदर्भा पुढे बोलताना भालके म्हणाले की, गावडे यांची बदली प्रशासकीय आहे, ते स्वतः बदलून जाणार होते आणि आठवडाभर त्यांची मुदत राहिली होती. त्यामुळे त्यांच्या बदलीला राजकीय रंग देणे चुकीचे आहे. शिवाय गावडे यांचा गवगवा सिंघम म्हणून केला जात असला तरी त्यांच्या काळात पंढरपूर शहरात अवैध दारू विक्री जोमात आहे, गांजा विक्री कोल्हापूर चे पोलीस येऊन पकडतात तरी यांना माहिती नव्हते. अवैध वाळू उपसा मुक्तपणे सुरू आहे. बंदुकीचा धाक दाखवून लुबाडल्याचे व्हीडिओ फुटेज उपलब्ध असूनही कारवाई का होत नाही ? 15 दिवसांपूर्वी एक विवाहित महिला एका डाॅन ने चाकु लावुन पति आणी मुलांचे समोरूण अपहरण करून नेली. 15 दिवस झाले तरी तिचा तपास का लागला नाही ? पंढपुरातला गांजा, गुटखा विक्री कोल्हापूर पोलिसांनी पकडला या सिंगमला का सापडला नाही. शहरात दररोज शेकडो टु व्हिलर, फोर व्हिलरवर पकडल्या जातात शासनाला किती गाड्याची रक्कम शासन जमा होते त्याची माहिती माझ्याकडे आली आहे, संपुर्ण सोलापुर जिल्ह्यात वडाप सुरू आसतानां पंढरपुरमध्येच बंद का ? सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या पोटावर का मारले जाते ? एस .टी.बसची सुविधा पुरेशी आसेल तर लोक वडापमध्ये कशाला जातिल ? मी अनेक वेळा ग्रामीण मधील विद्यार्थी बंन्धु, भगिनींणा दुसरी वाहन करून सोडायची व्यवस्था करायला लावली,ती माझी जबाबदारी होती. मागील महिन्यात ठेकेदारांच्या सांगण्यावरून पंढरपूरमध्ये रस्त्याच्या कामासाठी शहरातील जातीय, धार्मिक सलोखा कुणी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला ? त्या दिवशी फार मोठा जातिय संघर्ष झाला आसता मात्र मी तेथुन प्रांताधिकारी, तहसीलदार, सी ई ओ नगरपालिका. डी वाय एस पी या सर्वानां फोनवरूण सुचनां केल्या आणि तो विषय मीे सर्वाबरोबर चर्चा केली सोडवला. राजरोस पने दारू .मटका. इत्यादी दोन न॔बर धंद्दे सुरू आहेत त्याला कुणाचा आशिर्वाद आहे ? असाही सवाल आम भालके यांनी केला. तमाम पंढरपूर करानां सिगंम सांगतिल का माझ्या कडे ईसबावी मध्ये दुध डेअरी शेजारी खुले आम दारू विक्रि सुरू आहे महिलानी लेखी तक्रार दिली त्या सिंगम आधिकार्याला दोन वेळा बोलावुन सांगितल तरीही ते धंदे बंद झाले नाहीत. सागोंलामधुन याना माजी आमदार गणपत आबा आणी दिपक आबा यानीं बोलावुन घेऊन अर्ज लिहुन घेतला आणि सोलापुरला का पाठवलं ? ते संपूर्ण सांगोला तालुक्यला महित आहे. उलट मला हे सिंगम भेटायला आल्यावर मी लगेच पंढरपूरसाठी शिफारस दिली आणी सांगितल चाग॔ल काम करा वाईट कामला पाठिंबा नाही असे सांगून येथे येण्यासाठी पत्र दिले होते. ते स्वतः बदली करून जाण्यासाठी प्रयत्न करीत होते आणि आठवड्यात त्यांची बदली होणार होती. तरीही आठ दिवस अगोदर बदली झाली म्हणून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काही लोक जातीय रंग देत आहेत. अशा लोकांची मला फिकीर नाही, माझे सर्वसमावेशक काम माझ्या जनतेला माहीत आहे म्हणून तर गेल्या 3 वेळा जनतेने मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. जनतेच्या मनात संभ्रम होऊ नये, ज्यांची बदली झाली त्यांच्या कार्यकाळात शहरात अवैध धंदे वाढले होते, कायदा सुव्यवस्था धोक्यात आली होती, राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यास परवानगी देतानाही दुजाभाव केला जात होता, पंढरपूर परिसरात त्यांनी जमा केलेली माया, कुठं कुठं काय काय आहे हेही मला माहिती आहे. अशा अधिकाऱ्यांची बदली हा शहराच्या नागरिकांसाठी फरक पडणारा विषय नाही. त्यामुळे बदलीचे राजकारण करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना नागरिकांनी ओळखावे असेही आवाहन आम भालके यांनी केले आहे.
नियमित बदलीत अधिक कार्यक्षम अधिकारी बदलून येतील-आ. भारत भालके
सध्या काही मुली भगिनींणा गेर समज करून आमदारांनी बदली केली आणी आंदोलनाचा पवित्रा घेनार आशा बतम्या व्हाट्स अप, फेसबुक वर बघायला मिळाल्या. त्या माझ्या भगिनींना एक खुलासा करतो गावडे यांनी पुण्याला बदली विनंती केली आहे, त्यासाठी एक महिना झाले, त्या मुळेे पंढरपूर मधे गेली 20 दिवस विसकळित पना आहे. माझ्या मतदार संघातील भगीनीणी भयभित होन्याच कारन नाही. या पेक्षा आत्यंत कडक शिस्त प्रिय आधिकारी नियमित बदल्या मध्ये नक्की येतील, कुणीच आधिकारी आजीव किंवा तहहयात नसतात त्या मुळे मी या गोष्टीचा खुलासा करतोय. राजकीय बदली असल्याचा पुरावा आसले तर तो दिलातर बर होईल व या पेक्षा जस्तीची माहिती या नंतर ही मी देईन ती पुराव्यासह.आदोंलन करायचं आसेल तर ज्या महिलेला पळवुन नेहुन जो आत्याचार केलाय त्याला कडक कारवाई करा म्हनुन करावे असेही आवाहन आ भालके यांनी केले.