एम.डी. पॅथॉलॉजिस्ट एक ‘सबलॅब’ अनेक !

एम.डी. पॅथॉलॉजिस्ट एक ‘सबलॅब’ अनेक !

डिजिटल स्वाक्षरी,प्रिंटेट सहीच्या रिपोर्ट्सची पडताळणी होणार ?

या बाबत कारवाईचे अधिकार आमच्याकडे नाहीत- डॉ.जयश्री ढवळे

राज्यात १२ कोटी जनतेच्या तुलनेत फक्त ३,१६१ रोगनिदानशास्त्रज्ञ (पॅथॉलॉजिस्ट) आहेत. ही संख्या खूपच अपुरी असल्याने राज्यात बेकायदा ‘पॅथॉलॉजी लॅब’चा सुळसुळाट झाल्याची स्पष्ट कबुली सरकारने अगदी विधीमंडळात उपस्थित झालेल्या प्रश्नास उत्तर देताना दिली होती.अनेक ठिकाणी विविध हॉस्पिटल मध्ये खोलीलाच पॅथॉलॉजी लॅब म्हणून बोर्ड लटकवले जातात आणि त्या ठिकाणी आलेल्या रुग्णांना येथून रक्ताच्या विविध चाचण्या करून घेण्याचा सल्ला दिला जातो.या पैकी अनेक हॉस्पिटलमध्ये थाटण्यात आलेल्या या लॅब मध्ये कुठलेही एम.डी. पॅथॉलॉजिस्ट नियुक्त करण्यात आलेले नसून खाजगी लॅब चालक असलेल्या पॅथॉलॉजिस्टचे डिजिटल ही सही असलेले अथवा थेट लॅब च्या रिपोर्ट पेपरवर सहीच प्रिंट केलेले रिपोर्ट दिलॆ जात असल्याचे आढळून येते.
   ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट’ या संघटनेच्या तक्रारीनंतर रवाई करण्यात आली होती. मात्र राज्यात पुन्हा याबाबत कुठे ठोस कारवाई होताना आढळून आली नव्हती.  वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्धच्या तक्रारीची चौकशी करून दोषींना शिक्षा देण्याचे अधिकार महाराष्ट्र वैद्यक परिषदेला आहेत आरोग्य चाचण्यांचे अहवाल हे केवळ पॅथॉलॉजी विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या नोंदणीकृत डॉक्टरांच्या सहीनेच देणे बंधनकारक असतानाही काही लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट स्वत: चाचणी न करता अहवालावर डिजिटल स्वाक्षरी करीत आहेत. त्यामुळे अनेक प्रकरणांत आजाराचे चुकीचे निदान होत असून, चुकीचे उपचार होत आहेत. यामुळे लाखो रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विधानसभेत व विधानपरिषेदेत अनेक वेळा करण्यात आलेली आहे मात्र त्या बाबत ठोस कारवाई होताना दिसून येत नाही.सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात देखील अनेक आमदारांनी या बाबत कारवाई व्हावी यासाठी तारांकित प्रश्नही उपस्थित केला आहे.
‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या नियमानुसार पॅथॉलॉजिस्टच्या पदवीधराने स्वतःच्या उपस्थितीत विविध चाचण्या कराव्यात, त्या चाचण्यांचे रिपोर्ट तपासावेत; तसेच त्यानंतर स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. मात्र, काही लॅबमध्ये लॅबचालक आणि पॅथॉलॉजिस्टनी संगनमत केले आहे. त्यानुसार प्रत्यक्षात लॅबमध्ये हजर नसताना त्यांच्या नावाचे लेटरपॅड अथवा डिजिटल सहीचा वापर करण्याची मुभा पॅथॉलॉजिस्ट देत आहेत. प्रत्यक्षात रुग्णांना याबाबत माहिती नसते. रुग्णाचे रक्त, लघवीचे नमुने व्यवस्थित तपासले आहेत की नाही, हे पॅथॉलॉजिस्टने पाहणे गरजेचे असते. चाचणी झाल्यानंतर त्याचे रिपोर्टही नजरेखालून घालून त्यावर नंतर स्वाक्षरी करणे अपेक्षित असताना त्या ठिकाणी पॅथॉलिजिस्ट उपस्थित नसल्याचे आढळले. प्रत्यक्षात चाचणी न करता त्या रिपोर्टवर सही केली जात असेल अथवा त्या पॅथॉलॉजिस्टच्या नावाचा वापर करून रिपोर्ट दिला जात असल्यास ती प्रत्यक्षात फसवणूक होत आहे. कोणताही पॅथॉलॉजिस्ट एकाच ठिकाणी चाचण्या करून त्यावर सही करू शकतो. तो अनेक ठिकाणी हजर राहू शकत नाही.असे असताना अनेक हॉस्पिटलच्या आवारात डीएमएलटी झालेले व्यक्ती लॅबचे संचलन करीत असून या ठिकाणी तपासणी केलेल्या रक्तचाचणीचे रिपोर्ट मात्र संबंधित अघोषित करारबद्ध पॅथॉलॉजिस्टच्या डिजिटल किंवा प्रिंटेट स्वाक्षरीचे दिले जाताना अनेक ठिकाणी आढळून येते.
  सध्या देशभरात कोरोना सारख्या जीवघेण्या आजराचे रुग्ण आढळू लागले आहेत त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे.अशा वेळी एम.डी. पॅथॉलॉजिस्टयांच्या उपस्थितीत चाचणी केलेले   विविध रक्तचाचण्याचे रिपोर्ट दिले जाणे गरजेचे असताना डिजिटल व प्रिंटेट सहीचा वापर करणे धोकादायक ठरणार आहे. 
      या बाबत पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे यांच्याकडून अधीक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अशा प्रकारे पॅथॉलॉजी लॅब व कारवाई करणे आमच्या अधिकार कक्षेत येत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.मात्र ज्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारे पॅथॉलॉजि लॅब सुरु आहेत त्या हॉस्पिटलची तपासणी करण्याचे अधिकार आम्हाला असल्याचे पंढरी वार्ताशी बोलताना सांगितले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 week ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 week ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

2 weeks ago