कुटुंबायाना ठार मारण्याची धमकी देत पंढरीत विवाहित महिलेचे अपहरण
पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पंढरपूर शहरातील समता नगर भागातील महिला आपल्या मुलीस शाळेतून घरी घेऊन येण्यासाठी गेली असता त्या महिलेचे ओळखीच्या तरुणासह आणखी एका अज्ञात इसमाने अपहरण केल्याची फिर्याद सदर महिलेच्या पतीने पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.सदर महिलेच्या लहान मुलीस रस्त्यावर सोडून देत अपहरण कर्ते पसार झाले असून सदर घटनास्थळी फिर्यादीने तातडीने धाव घेतली असता त्या छोट्या मुलीने आईला दोन इसमांनी पळवून नेले असल्याचे सांगतिले.
सदर घटना हि शनिवार दिनांक २९ फेब्रुवारी रोजी घडली असून सदर विवाहित महिला आपल्या मुलीस शाळेतून घरी घेऊन येण्यासाठी गेली होती.त्यावेळी सदर महिलेच्या पतीशी ओळख असलेला इसम नाव सतीश देवकर (रा.इसबावी.पंढरपूर ) त्या ठिकाणी आला व त्या महिलेस व तिच्या कुटुंबास ठार मारण्याची धमकी देत सोबत चल असा तगादा लावला. त्यावेळी सदर महिलेने आपल्या पतीस फोन लावून या प्रकाराची माहिती दिली.सदर महिलेच्या पतीने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असती त्या ठिकाणी त्यांची लहान मुलगी एकटी दिसून आली. तिने आईला दोनजण गाडीवर बसवून घेऊन गेल्याची माहिती वडिलास दिली.सदर महिलेचा दोन दिवस नातेवाईक व इत्रत शोध घेतल्यानंतर फिर्यादीने आज पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…