आज दारावर थांबलात उद्या विरोध कारण्याचे धाडस दाखवाल ?
परिस्थिजन्य पुरोगामी म्हणून जग तुमची निंदा करू नये याची आठवले समर्थक काळजी घेणार ?
(विशेष संपादकीय- राजकुमार शहापूरकर )
आज पंढरपूर तालुक्यात अतिशय नगण्य प्रमाणात असलेल्या भोळ्या भाबड्या भक्तांच्या समस्या रुपी रोगावर धार्मिक अधिष्ठान प्राप्त असल्याचा दावा करीत आणि एकच गादीची सोयीनुसार दोन गाद्यात वाटणी करून घेऊन आणि गादीच्या वाटणीबरोबरच अत्यल्प असलेल्या भक्तांचीही वाटणी करून आपला भक्तीचा दरबार भरवत असलेल्या तथाकथित हटयोगी तनाळीकर महाराजाने संत मेळाव्याचे आयोजन केले होते.माजी आमदार ढोबळे हे त्यांचे भक्त आहेत कि नाही याची पुरेशी माहिती नाही पण नितीन गडकरी यांचा चरणस्पर्श केल्यापासून भाजपाच्या झेंड्याशी इमान बाळगल्यापासून ढोबळे हे सातत्याने आपल्या राजकीय पुनर्वसनाची संधी शोधत आले आहेत.आणि यातूनच सीएएचे समनर्थ केले तर वंदनीय गडकरी पुन्हा आपल्या निष्टेला कुठेतरी वाव देतील अशी त्यांची आशा असावी म्हणूनच त्यांनी पंढरपूर तालुक्यातील तनाळी वगळता इतर गावात ओळख निर्माण करण्यासही अपयशी ठरलेल्या शिवाजी तनाळीकर यांना समर्थन देत पंढरीत संतमेळाव्याचे आयोजन करण्याचा घाट घातला. आणि आज झालेल्या मेळाव्याच्या फ्लॉप शो मुळे त्यांना मोहोळ राखीव मतदार संघातून भाजपाची उमेदवारी न मिळाल्यामुळे जेवढे दुःख झाले होते तेव्हडे झाले असावे. पण आजच्या या मेळाव्याचे वैशिष्टय म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठ्वले यांचे आगमन.पण ना. रामदास आठवले यांनी कुठलेही भाषण न करता काढता पाय घेतल्यामुळे बाल वारकऱ्यांचा वेश परिधान करून थांबलेल्या विद्यार्थ्यांचे मात्र कष्ट वाया गेले. एकतर या संत मेळाव्याकडे पंढरपुरातील अगदी सनातनी संतांनी देखील पाठ फिरविली आणि यातच भरीस भर म्हणजे ना. आठवले यांच्या पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेळाव्यास उपस्थित न राहता दारावरच आपल्या नेत्याचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला.आणि तो निदान या तालुक्यातील बहुतांश जनतेला रुचलेला असावा.
एखाद्या पक्षाचा नेता जो पर्यंत सरकार मध्ये सामील नसतो मंत्री नसतो तेव्हा त्या नेत्याला वैचारिक नाळ न जोडणाऱ्या पक्षाच्या,संघटनेच्या अथवा सार्वजानिक कार्यक्रमास उपस्थित राहता येत नाही, जर असे झाले तर तो नेता दुहेरी भूमिका घेत असल्याचा आरोप हा होणारच.पण हाच नेता जेव्हा सरकार मध्ये सहभागी असतो तेव्हा तो राज्यसरकार अथवा केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करीत असतो तेव्हा त्यास अगदी विरोधी विचार सरणीच्या लोकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास देखील आमंत्रण स्वीकारल्यानंतर उपस्थित रहावे लागते आणि आज पंढरपुरात तसेच घडले. ‘राखीव जागा’ असेल तर उमेदवारी या घटनात्मक तरतुदीचा फायचा पुरेपूर घेत निवडणूक लढवून राजकारणात पुढे आलेल्या माजी मंत्री ढोबळे सर यांच्या ‘कुशल मार्गदर्शनाखाली’ आयोजित पंढरीतील सीएए समर्थनाच्या आजच्या संत मेळाव्याकडे बहुजन समाजातील संतांनी पाठ फिरविली असती तर गोष्ट वेगळी पण अगदी कर्मठ सनातनी संतांनी देखील पाठ फिरविली असल्याचे दिसून आले आणि इथंच खरंतर ढोबळे यांचा आणि त्यांच्या पुरोगामी म्हणून वावरणाऱ्या समर्थकांचा अवसानघात झाला आहे.आणि या बद्दल जे खरे आंबेडकरी विचारधारेला वाहून घेतलेले आहेत ते समाधानी आहेत.
साहेब तुम्ही जिकडे तिकडे आम्ही असे एकेकाळी दलित पँथर म्हणून वावरलेल्या आठवलेना दाखवून देत आपली राजकीय पोळी भाजून घेणारेही अनेकजण आहेत पण आज सीएए ला समर्थन देण्यासाठी आयोजित केलेल्या या संत मेळाव्यास आम्ही उपस्थित राहणार नाही भले तर आम्ही आमचे नेते म्हणून तुमच्या स्वागताला कार्यक्रम स्थळी दारावर थांबू असे ठणकावून सांगणारे काही ना. आठवले समर्थक पंढरपुरात आहेत याची आज प्रचिती आली आहे.
या धाडसी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आमचा एकच प्रश्न आहे.ना. रामदास आठवले हे ! आज आठवले मंत्री आहेत, या नात्याने ते आजच्या या तथाकथित आणि स्वयंघोशीत तनाळीकर हटयोग्याच्या आणि सत्तेसाठी कुठलीही विचारधारा मान्य करणाऱ्या माजी मंत्री ढोबळे यांच्या कार्यक्रमास तुमचा वैचारिक पाठिंबा नव्हता म्हणून कदाचित तुम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी दारावर थांबलात पण आपल्यां नेत्यांना आणि आपल्याच आरपीआय मधील सोशल मीडियावर वेगळी आणि ”साहेब” आल्यानंतर वेगळी भूमिका घेणाऱ्या आपल्या परिसरातील आपल्याच नेत्यांना कधी जाब विचारणार आहात काय ?
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…