आदमीले फूडसचा बुधवारी शुभारंभ
पंढरपूरातील खवय्यांना सहकुटुंब घेता येणार आस्वाद
गेल्या पाच दशकांपासून आदमीले बंधूंची भेळ म्हणजे पंढरपूर शहराची एक ओळख बनली आहे.उद्योग,व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने पंढरपूर बाहेर गेलेले पंढपुरकर जेव्हा पंढरपुरात येतात तेव्हा आदमीले यांची भेळ खाण्यास जाणे हा आवडीचा विषयठरला आहे.त्यामुळे आदमीले हा एक ब्रँड म्हणून राज्यभरात ओळखला जाऊ लागला आहे.आणि आपल्या ग्राहकांना सहकुटुंब याचा आस्वाद घेता यावा म्हणून आता आदमीले फूड्स या नव्या फर्मचे उदघाटन बुधवार दिनांक १९ रोजी गोविंदपुरा येथे सायंकाळी ठीक ७ वाजता मा.आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आ. भारत भालके हे भूषवणिनार आहेत.
या कार्यक्रमास ह भ.प.मदन महाराज हरिदास,मर्चंट सह.बँकेचे चेअरमन नागेश भोसले,नगराध्यक्षा साधना भोसले,सोलापूर जनता सह. बँकेचे माजी चेअरमन मुकुंद देवधर,रुक्मिणी सहकारी बँकेच्या चेअरमन सुनेत्रा पवार,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,आर्यवैश्य कोमटी समाजाचे अध्यक्ष रजनीश कवठेकर सिने अभिनेते शाम सावजी,सत्यविजय मोहोळकर,प्रसिद्ध व्यापारी सारंग फडे,धनंजय कोताळकर आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी आदमीले फूड्सच्या या उदघाटन सोहळ्यास उपस्थित रहावे अशी विनंती आदमीले बंधू यांच्यावतीने करण्यात येत आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…