कौठाळी येथे भर दिवसा अवैध वाळू वाहुतक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची कारवाई
वाळू चोर पसार तर महसूलचे कर्मचारी अनभिज्ञ
पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथून पुन्हा एकदा भर दिवसा वाळू चोरीची घटना उघड झाली असून या बाबत पोलिसांनी एक ट्रॅक्टर डम्पिंग ट्रॉलीसह ताब्यात घेतला आहे मात्र सदर ड्राइवर पसार झाला असून या बाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात सिद्धेश्वर गोरख थोरात नेमणूक पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे यांनी फिर्याद दाखल केली आहे.भर दिवसा वाळू चोरीचा हा प्रकार घडत असताना पोलीस पाटील तलाठी व मंडळ अधिकारी हे महसूल प्रशासनाचे गावपातळीवर अवैध वाळू उपसा रोखण्याची जबाबदारी असलेले कर्मचारी मात्र भर दिवसा अनेक ठिकाणी वाळू उपसा होत असतानाही कारवाई करीत नाहीत अशी चर्चा आता तालुक्यात होत आहे.नुकतेच शेळवे येथे स्वतः तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी कारवाई करून वाळू साठे जप्त केले असले तरी सदर वाळू उपसा करणारे वाळू चोर नक्की कोण याची माहिती मिळू शकली नाही. शेळवे येथे स्वतः तहसीलदारांनी कारवाई करून देखील दुसऱ्याच दिवशी कौठाळी येथे भरदिवसा वाळूचोरी होते याबाबत आशचर्य व्यक्त केले जात आहे.
कैठाळी गावचे हद्दीत भिमा नदीचे पात्रातुन अवैधरित्या वाळुचे उत्खनन करून ट्रक्टरद्वारे चोरून वाळु वाहतुक करीत आहेत अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने पोसई/खान,सपोफौ/डोंगरे,पो. कॉ. बाबर हे खाजगी वाहनाने कौठाळी गावचे शिवारातील राजु गोडसे यांचे शेताजवळ गेले असता नदी पात्रातुन कौठाळी गावचे दिशेने कच्चे रस्त्यावरून समोरून एक निऴे रंगाचा सोनालीका कंपनीचा ट्रँक्टर व डंम्पिग ट्रलीसह येताना दिसला ट्रँक्टर जवळ येताच ड्रायव्हरला थांबण्याचा इशारा केला असता ट्रँक्टर ड्रायव्हरने त्याचा ट्रँक्टर जागीच रोडवर थांबवुन तो ट्रँक्टरवरून उडी मारून रोड लगत आसलेल्या ऊसाचे पिकाचा फायदा घेवुन ऊसात पळुन गेला पळुन गेलेल्या ट्रँक्टर ड्रायव्हरचे नाव गाव पत्ता बाबत आजुबाजुस चौकशी केली असता त्याचे नाव सतिश राजाराम होळकर रा- व्होळे ता-पंढरपूर असे आसल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी वाळु एक ब्रास किमंत रूपये 6000/- व MH 13 BR 4071 व निळे डंम्पिंग ट्रली ट्रँक्टरचे डंम्पिग ट्रलीसह किमंत रूपये 6,00,000/-असा एकुण किमंत रूपये जप्त करून पोलीस ठाणे आवारात आणुन लावला आहे या प्रकरणी सतिश राजाराम होळकर रा- व्होळे ता-पंढरपूर विरूध्द भा.द.वी कलम 379 प्रमाणे व पर्यावरण संरक्षण कायदा कलम 9व15 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.