पंढरपूरच्या महिलेस लुबाडणाऱ्या फेसबुक फ्रेंड ‘मॉडेलचा’ पंढरपूर शहर पोलिसांनी केला पर्दाफाश

पंढरपूरच्या महिलेस लुबाडणाऱ्या फेसबुक फ्रेंड ‘मॉडेलचा’ पंढरपूर शहर पोलिसांनी केला पर्दाफाश 

मुलाने आईस फेसबुक अकाउंट काढून दिले आणि बनावट फ्रेंडने घातला लाखोंचा गंडा

सोशल मीडिया कनेक्टिव्हिटी बाबत केवायसी बंधनकारक करण्याचे सूतोवाच केंद्रीय गृह विभागाने नुकतेच केले होते.यास प्रचंड विरोध होऊ लागल्याने सरकारचा असा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्टीकरण नुकतेच केंद्र सरकारने दिले असले तरी  फेसबुक,व्हाट्स अप सारख्या सोशल मीडियावावर बनावट नावाने वावरणाऱ्या काही ठकसेनानी नेमके याच बाबीचा फायदा उठवत अनेकांना कधी प्रेमाच्या जाळ्यात ओढून तर कधी आर्थिक फायदाच्या भूलथापा फसविले असल्याच्या घटना सातत्याने उघड होत आल्या आहेत.मात्र महानगरात घडणाऱ्या अशा घटनांचे लोन आता थेट पंढरपूर पर्यंत आले असल्याचे पंढरीत नुकत्याच झालेल्या फसवणूक प्रकरणामुळे स्पष्ट झाले आहे.पण सदर प्रकरणात पंढरपूर शहर पोलिसांनी अशाच एका मॉडेलला जेरबंद केले आहे.या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेस सोशल मीडिया बाबत फारशी माहिती नसल्याने फसवणूक झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

       एका प्रतिष्ठित घरातील महिलेची जर अशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक होत असेल तर सामान्य अर्धशिक्षित व अशिक्षित महिलांचे काय ? अशी शंका उपस्थित होणे साहजिकच आहे.पंढरपूर शहर तालुक्यातील हजारो व्यक्ती फेसबुकवर सक्रिय असल्याचे दिसून येते.त्यांना अनोळखी व्यक्तीकडून फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट येत  असल्याचे अनेकजण खाजगीत मान्यही करीत असल्याचे दिसून येतात या पैकी अनेक फ्रेंड रिक्वेस्ट या बनावट नावाने असल्याचे फसवणुकीची घटना घडल्याशिवाय उघड होत नाही त्यामुळे फेसबुकवर सक्रिय असलेल्या व्यक्तींनी आपण ज्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारत आहोत त्याला आपण प्रत्यक्षात ओळखतो का याची खात्री करणे गरजेचे झाले आहे.या फसवणूक प्रकरणी फसलेली महिला ही जास्तीच्या आर्थिक फायद्याचे आमिष दाखविल्यामुळे फसली असल्याचे स्पष्ट झाले असल्याने फिर्यादीचे नाव नैतिक जबाबदारी म्हणून गुप्त ठेवण्यात येत आहे.     

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

20 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago