भाविकांचा मोबाईल मंदिर समीतीच्या लॉकरमधून परस्पर लंपास
पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समीतीच्या वतीने डिसेंबर २०१९ मध्ये विठ्ठल मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची समर्थन विठ्ठल मंदिराचे प्रशासन करीत असतानाच सर्वसामान्य भाविकांना मोबाईल बंदीचा फार मोठा त्रास सहन करावा लागणार आहे अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटली होती.मोठ्या प्रमाणात विरोध होत असतानाही मंदिर समितीने हा निर्णय १ जानेवारी पासून अमलात आणला खरा पण त्यानंतरही काही राजकीय नेतेमंडळीच्या सोबत आलेले कार्यकर्ते मंदिरात बिनधास्त मोबाईल घेऊन जातात व मंदिर प्रशासन याबाबत दुजाभाव करीत असल्याचे असल्याचा आरोप होताना दिसून आला. पण आता एका वेगळ्याच कारणाने समितीच्या मोबाईल सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला असून एका भाविकाने समितीच्या लॉकरमध्ये मोबाईल ठेवून पावती घेतली पण ज्या पाकिटात हि पावती ठेवली ते पाकीटच गहाळ झाले आणि अज्ञात व्यक्तीने ती पावती दाखवून समितीच्या लॉकर मधील मोबाईल घेऊन पोबारा केला आहे.
महेश वसंत पवार (रा. हडपसर पुणे. हे सहकुटुंब देवदर्शनासाठी पंढरीत आले होते. छत्रपती शिवाजी चौक येथे पार्कींगमध्ये लावून ते दर्शनासाठी गेले असता मंदीर समितीकडील असणारे लाँकर मध्ये मोबाईल जमा केले व पावती घेतली. पावती दर्शन घेवून मंदीराचे बाहेर आलो. तेव्हा माझ्या लक्षात आले असता पाठीमागील खिश्यातील पाँकेट कोठेतरी पडून गहाळ गहाळ झाल्याचे अथवा अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे आढळून आले. या घटनेनंतर सदर फिर्यादी पवार हे लाँकरमध्ये ठेवलेले मोबाईल आणण्यासाठी मंदिरात गेले असता तुम्ही ठेवलेल्या लाँकरमधील मोबाईल नसून तुम्हाला दिलेली पावती दाखवून मोबाईल घेवून गेल्याचे तेथील कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले व सदर पावती दाखविल्याचेही सांगितले.
या बाबत महेश वसंत पवार यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात माझ्या संमतीवाचून लाँकरमध्ये ठेवलेले मोबाईल व पाँकेट मध्ये असलेले आधारकार्ड, पँनकार्ड, अँक्टीव्हा मो.सा.चे आर.सी.बुक, ए.टी.एम.कार्ड व रोख रक्कम चोरुन नेल्याची खात्री झाल्याने त्याबाबत तक्रार दिली आहे. चोरीस गेलेल्या मोबाईलचे व पाँकेटमधील असलेल्या वस्तुंचे वर्णन खालीलप्रमाणे 1) 3,800/- रु. भारतीय चलनाच्या नोटा त्यामध्ये 100, 500रु दराच्या चलनी नोटा.2) 00.00/- रु. आधारकार्ड, पँनकार्ड, अँक्टीव्हा मो.सा.चे आर.सी.बुक, SBIचे ए.टी.एम.कार्ड किं.अं.3) 30,000/- रु. एकुण चार मोबाईल 1) VIVO-10, 2) सँमसंग गँलँक्सी मँक्स, 3) सँमसंग गँलँक्सी 4G, 4)सँमसंग जु.वा.किं.अं. 33,800 रुपये. अशा प्रकारे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.