अभिजित पाटील बनत आहेत युवकांचे प्रेरणास्थान तर डीव्हीपी ग्रुप ठरला आहे पंढरपूरकरांचा मानबिंदू

अभिजित पाटील बनत आहेत युवकांचे प्रेरणास्थान तर डीव्हीपी ग्रुप ठरला आहे पंढरपूरकरांचा मानबिंदू 

अभिजित पाटील यांनी पंढरपूरच्या राजकारणात सक्रिय व्हावे,तरुणाईकडून व्यक्त होत आहे अपेक्षा !

(पंढरी वार्ता विशेष : राजकुमार शहापूरकर)  

गेल्या तीन दशकापासून पंढरपूर तालुका हा विस्थापित तरुणांचा तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.याला कारणही तसेच प्रबळ आहे आज पंढरपूर तालुक्यात देशात नामांकित असलेले स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयासह शेळवे येथील कर्मयोगी पॉलिटेक्निक, न्यू सातारा महाविद्यालय,सिहगड महाविद्यालय यांच्यासह अनेक नामांकित महाविद्यालये,शिक्षण संस्था आदी अनेक दर्जेदार अभियांत्रिकी,फार्मसी आदींचे शिक्षण देणाऱ्या नामांकित संस्था उदयास आलेल्या आहेत आणि पंढरपूर शहर तालुक्यातीलच नाही तर देशभरातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत आहेत.पंढरपूर शहर तालुक्यातील विद्यार्थ्यांना  रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध  व्हावा यासाठी पंढरपुरात १९८० च्या दशकात पंढरपुरात भव्य मोर्चा निघाला होता पंढरपूरचे माजी आमदार तात्यासाहेब डिंगरे यांनी जळका वाडा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास शासनास भाग पाडले होते.याच काळात आणखी एक मागणी पुढे आली होती ती म्हणजे एमआयडीसीची पण  हि मागणी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्यकाळात पूर्ण झाली ना आ. भारत भालके यांच्या १० वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात.मात्र याचा थेट परिणाम पंढरपूर शहर/ तालुक्यातील अर्थकारणावरच झाला नाही तर पंढरपूर तालुक्यातील कुटुंब व्यवस्थेवरही  झाला असल्याचे दीसून येते,याचीच परिणीती म्हणून पंढरपूर शहरात फेरफटका मारल्यास अनेक घरे बंगले येथे एकाकी जीवन जगत असलेले आईवडील आणि मुले मात्र रोजगार उपलब्ध नसल्याने पुणे,मुंबईसह राज्यातील इतरही अनेक औद्योगिक क्षेत्रांत नोकरीसाठी निघून गेल्याचे दिसून येते.ज्या वयात गोकुळासारख्या भरल्या घरात नातवंडांसह रमायचे त्या वयात म्हातारे आई वडील एकाकी जीवन जगत असल्याचे दिसून येते.आणि याला कारण केवळ आणि केवळ राज्यकर्ते आणि प्रस्थापित नेते आहेत हे मान्य करावेच लागेल. दगडधोंड्याचे डांबरी रस्ते आणि प्रशासकीय इमारती उभारणे हेच केवळ राज्यकर्त्यांचे कर्तव्य नसते तर आपल्या जन्मभूमीवर प्रेम करण्याऱ्या तरुणांना येथेच रोजगार उपलब्ध झाला पाहिजे याची जबाबदारीही लोकप्रतिनिधी व राज्यकर्त्यांवर असते पण दुर्दैवाने तसे घडले नाही.पण हे सारे घडत असताना आशेचे किरण ठरणारे काही युवा उध्योजक पुढे आले.आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी नवनवे उद्योग उभारले आणि शेकडोने नाही तर हजारोने रोजगार निर्माण केले आणि यात सर्वात अग्रभागी आहेत ते पंढरपूरचे उदयोजक अभिजित पाटील आणि त्यांचा डीव्हीपी उद्योग समूह.त्यामुळेच अभिजित पाटील हे या शहरातील युवकांचे प्रेरणास्थान बनले आहेत तर डीव्हीपी ग्रुप पंढरपूरकरांचा मानबिंदू ठरला आहे.आणि प्रस्थापित नेत्याकडून भ्रमनिरास झालेले तरुण अभिजित पाटील यांनी पंढरपूरच्या राजकारणात सक्रिय व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करताना दिसून येत आहेत. 
            स्व.धनंजय पाटील सदा हसतमुख आणि वकिली पेशात असूनही निर्गर्वी व्यक्तिमत्व, प्रत्येकाशी आपुलकीने वागत त्यांनी मोठा लोकसंग्रह केला होता.स्व. अरुण गुजर,अप्पा करजगी यांच्याशी त्यांच्या सायंकाळच्या वेळी गप्पाच्या मैफिली जमत आणि त्यात सहभागी होण्यास मला ज्युनियर मेंबर म्हणून अनेकवेळा लाभले. त्याकाळी करजगी वाडा स्टेशन रोड येथे हॉटेल हॉटेल राधेश सुरु झाले होते आणि या साऱ्या प्रक्रियेचा मी जवळचा साक्षीदार होतो.हृदयविकाराच्या धक्क्याने स्व. धनंजय पाटील अचानक गेले पण आज त्यांचे सुपुत्र अभिजित पाटील आणि अमर पाटील यांनी त्यांच्यापासून प्रेरणाघेत उभारलेला विविध उद्योगाचा पसारा नक्कीच तरुणांना प्रेरणा देणारा आहे.    

     आज पंढरपूरमध्ये भव्य डीव्हीपी  मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या यात राज्यभरातून जवळपास अडीच हजार स्पर्धकांनी भाग घेतला.आणि डीव्हीपी उद्योगसमूह आणि याचे सर्वेसर्वा अभिजित पाटील व अमर पाटील हे बंधू पुन्हा चर्चेत आले.गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत डीव्हीपी उद्योग समूहाने जशी विश्वासाहर्ता प्राप्त केली त्याच बरोबर या शहर तालुक्यातील अनेक युवकांना प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.पंढरपूर शहर हे लाखभर लोकसंख्येचे शहर पण पंढरीचे ”भागवत” म्हणून ओळखले जाणाऱ्या बोहरी परिवाराने अकबर,न्यू अकबर आणि आणि सरगम हे सिनेमागृहे टप्प्याटप्याने बंद केले आणि या शहर तालुक्यातील तरुणाईला आपल्या घरातल्या इडियट बॉक्सवर लागेल तो सिनेमा पाहणे बंधनकारक केले.आणि हि कमरता लक्षात घेऊन अभिजित पाटील,अमर पाटील आणि बोरगावकर कुटूंबाने एकत्र येत डीव्हीपी मल्टिफ्लेक्सची सुरुवात केली आणि डीव्हीपी हा या शहर तालुक्यातील तरुणाईला भुरळ घालणारा आयकॉन ठरला.एवढ्यावरच न थांबता व या तालुक्यातील प्रस्थापित साखर कारखानदारांना मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असतानाही आहे हे आयते कारखाने चालविणे कठीण होत असताना या पाटील बंधूनी उस्मानाबाद,नांदेड आणि नाशिक जिल्ह्यातील साखर कारखाने डीव्हीपी उधोगाच्या माध्यमातून घेऊन अवसानयात निघालेल्या या कारखान्यांना नवसंजीवनी दिली.तर डीव्हीपी गारमेंट्स,डीव्हीपी मॉल,डीव्हीपी इन्फ्रास्ट्रुक्चरच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. आणि त्यामुळेच अभंजित पाटील हे आज या शहर तालुक्यातील युवकांच्या गळयातील ताईत बनले आहेत,लोकप्रिय ठरले आहेत.   

  मात्र या साऱ्या घडामोडीत या शहर/ तालुक्यातील एक प्रबळ अपेक्षा व्यक्त होत आहे ती म्हणजे अभिजित पाटील यांनी पंढरपूरच्या राजकारणात सक्रिय होण्याची.आणि या लोकभावनेचा आदर करीत अभिजित पाटील हे शहर तालुक्याच्या राजकारणात एक राजकारणी म्हणून नव्हे तरुणांच्या/ जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणारा नेता म्हणून सक्रिय होणार का याकडे तरुणाईचे लक्ष लागले आहे.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 week ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

2 weeks ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

2 weeks ago