जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून पंढरपूरकरांच्या दहा अपेक्षा !

जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून पंढरपूरकरांच्या दहा अपेक्षा !

जिल्हाधिकारी आले,पाहणी केली,आदेश दिले आणि निघून गेले याची पुनरावृत्ती होऊ नये

(पंढरी वार्ता विशेष: भाग १)

सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून मिलिंद शंभरकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.गेल्या तीस वर्षात सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून अनेकांनी पदभार सांभाळला जनतेत हळूहळू जागृती होत असल्याने या पैकी लक्षात राहिली फक्त काही मोजक्या जिल्हाधिकारी यांची कारकीर्द.नुकतेच सोलापूरचे जिल्हाधीकारी पद भूषविलेले भोसले यांची कारकीर्द आमच्या दृष्टीने तरी सपक होती हे आम्ही ठामपणे नमूद करू इच्छितो.त्याला कारणही तसेच सबळ आहे आणि ते लोकभावनेवर आधारित आहे.जनता विसरभोळी असते असा राजकारण्यांचा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नेहमीच समज राहिला आहे पण गेल्या दोन दशकात लोकजागृतीने हा समज खोटा ठरवला आहे.आणि त्यामुळेच धडाडीने आणि धाडसाने निर्णय घेत त्याची अमलबजावणी करणारा अधिकारी जर निर्भीड असेल तर त्याची आटवणं आणी आदर जनतेच्या मनात कायम राहतो हे आजही अनुभवास येते.जे काम राज्यकर्ते करू शकत नाहीत ते प्रशासकीय अधीकारी करू शकतात हे या शहर तालुक्यातील जनतेने अनुभवले आहेत आणि म्हणूनच त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.आता सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून मिलिंद शंभरकर यांनी पदभार स्वीकारला आहे आणि त्यांच्याकडूनही जनतेच्या याच अपेक्षा आहेत हे आम्ही ठामपने नमूद करू इच्छितो !
पंढरपूर शहर तालुक्याने अनेक अधिकारी अनुभवले आहेत.पण सर्वात जास्त लक्षात राहिले ती तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांची कारकीर्द.पंढरपुरात वर्षाकाठी कोट्यावधी भाविक येतात पण खऱ्या अर्थाने भाविकांची वर्दळ असते ती चार प्रमुख यात्रेच्या काळात.विठ्ठलाची वारी हे खरे तर भक्तीचे प्रतीक पण या वारीला येणाऱ्या काही भाविकांकडून यालाच गालबोट लावले जात होते.चंद्रभागेचे वाळवंट तर म्हणजे घाणीचे आगर बनले होते.आणि नदीकाठचा परिसर दुर्गंधीचे.अशातच तुकाराम मुंडे यांनी जिल्हाधीकारी म्हणून सूत्रे सांभाळली आणि आमच्या दृष्टीने तरी एक ऐतिहासिक काम त्यांनी केले ते म्हणजे नदीपलीकडील ६५ एकर परिसरातील अतिक्रमणे हटवून ते त्याब्यात घेऊन विकसित करण्याचा.राजकीय विरोध झुगारून त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे समाधान नदीकाठच्या प्रत्येक नागरिकांकडून व्यक्त होताना दिसून येईल.याच बरोबर त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले पण आम्हाला येथे तुलना करण्याची नसल्याने व ते योग्य होणार नाही म्हणून आम्ही त्याचा उहापोह करीत नाही.
तसे पहिले तर पंढरपूरकर हे कर्तव्यदक्ष आणि धाडसी अधिकाऱ्याची फॅन राहिली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.जसे पंढरपूरचे तत्कालीन प्रांताधिकारी तथा नगर पालिकेचे प्रशासक रमानाथ झा,प्रांताधिकारी परिमल सिंह आणि विद्यमान प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या आठवणी आजही पंढरपूरकर काढतात तसेच नगर पालिकेचे तत्कालीन मुख्याधकारी जीवन सोनवणे यांची आठवण नक्कीच काढतात.हीच बाब पोलीस अधिकाऱ्यांबाबत जाणवते. अनेक अधिकाऱ्यांना पंढरपूरकर कधीच विसरणार नाहीत.पंढरपूरचे पोलीस उपअधिक्षक राहिलेले स्व.अरविंद इनामदार,विक्रम बोके, भूषणकुमार उपाध्याय,प्रशांत कदम,निखिल पिंगळे यांची कारकीर्द म्हणजे पंढरपूरकरांसाठी वरदान होती अशी श्रद्धा या शहर तालुक्यातील जनतेत दिसून येते. एखादा नेता,एखादा लोकप्रतिनिधी ते एखादा कर्तव्यदक्ष प्रशासकीय अथवा पोलीस अधिकारी करू शकतो याची प्रचिती आपल्यामुळेच जेव्हा जेव्हा धाडसी अधीकारी येतात तेव्हा जनतेने त्यांना ह्रदयात स्थान दिलेले दिसून येते.
सोलापूरचे नूतन जिल्हाधीकारी मिलिंद शंभरकर हेही असेच धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात.नियोजन,प्रशासनावरील वचक आणि दबावाला झुगारत धाडसाने निर्णय घेण्याची क्षमता असलेला अधीकारी हा एखाद्या आमदार,खासदार,नित्यापेक्षा लोकप्रिय ठरत असतो.आणि जिल्हाधीकारी मिलिंद शंभरकर हे त्यापैकीच एक आहेत हे आतापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीचा अभ्यास केल्यास दिसून येईल. आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यात्रा नियोजनाची बैठक घेतल्यानंतर शहरातील प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागेचे वाळवंट येथील अतिक्रमणे हटविण्याची सूचना स्थानिक प्रशासनास दिली असली तरी या तालुक्यातील जनतेस त्यांच्याकडून इतरही अनेक अपेक्षा आहेत त्या आम्ही पुढील भागात मांडत आहोत(क्रमश:)
– राजकुमार शहापूरकर

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago