मा.नगराध्यक्ष स्व. नारायण धोत्रे यांचा ९ वा स्मृतिदिन विविध उपक्रम साजरा
पंढरपूर नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष दलितमित्र स्व. नारायण धोत्रे यांच्या ९ व्या स्मृतिप्रीत्यर्थ पंढरीत मा.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत ३१ जानेवारी रोजी विविध विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ठीक १० वाजता रामकृष्ण वृधाश्रम येथे मा. सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते तर जि.प. सदस्य वसंत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व नगरसेवक संग्राम अभ्यंकर,विवेक परदेशी,धर्मराज घोडके,आदित्य फत्तेपूरकर,नवनाथ रानगट आदींच्या प्रमुख उपस्थितीत वृद्धांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.
सकाळी ठीक ११ वाजता गणेशरूग्णसेवा संचलित मूकबधिर विद्यालयात मा. नगराध्यक्ष वामन बंदपट्टे यांच्या हस्ते व मा.उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नगरसेवक इब्राहिम बोहरी,राजू सर्वगोड,बजरंग देवमारे,अमोल डोके,अंकुश पवार,गणेश पवार यांच्या उपस्थितीत मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.
दुपारी ठीक १२ वाजता नवजीवन निवासी अपंग शाळा येथे विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या हस्ते व उपनगराध्यक्षा लतिका डोके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास नगरसेविका सुप्रिया डांगे, आदी उपस्थित होत्या.
दुपारी ठीक १२.३० वाजता शाहिद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा येथे मा.नगराध्यक्ष सतीश मुळे यांच्या हस्ते व मा. नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास नगरसेवक अनिल अभंगराव,डी.राज सर्वगोड,रामभाऊ माळी,विकास टाकणे आदी उपस्थित होते.
या सर्व कार्यक्रमास प्रणव परिचारक मुन्ना गिरी गोसावी, दत्ता सिंह राजपूत, गणेश पवार, तात्या कांबळे, नितीन शेळके, सौदागर मोळक, संतोष जाधव, अनिल जाधव, शिंदे नाईक, राजू कांबळे, प्रमोद सागर, संतोष काळे, तुळजाराम बंदपट्टे, धनाजी वाघमारे, संतोष बंदपट्टे, लाला शिंगाडे, महादेव पवार, शंकर पाथरूड, नितीन धोत्रे, औदुंबर सिंगाडे, भीमराव पवार, आनंद कासट, नितीन कांबळे आदी उपस्थित होते.
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.नगराध्यक्ष दगडू धोत्रे आणि समाजसेवक दत्तात्रय धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरत्न तरुण मंडळ,आदिशक्ती तरुण मंडळ, ज्ञानेशवर नगर,रमजाने तरुण मंडळ डवरी गल्ली,न्यू वडार समाज गणेशोत्सव मंडळ,न्यू वडार समाज नवरात्र महोत्सव मंडळ,गजानन महाराज भक्त मंडळ आदींच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.