अन्न विभाग सुस्त,उत्पादन शुल्क विभाग मदमस्त तर पोलीस विभाग कारवाईत व्यस्त !

अन्न विभाग सुस्त,उत्पादन शुल्क विभाग मदमस्त तर पोलीस विभाग कारवाईत व्यस्त !

२०११ च्या शासनादेशाकडे अन्न विभाग आणि उत्पादन विभागाचे दुर्लक्ष 

२००४ मध्ये मुंबईतल्या विक्रोळी येथे हातभट्टीची विषारी दारू प्यायल्यामुळे शंभरहून अधिक लोकांचे बळी गेले होते. मिथेनॉल या विषारी रसायनाचा वापर करून बनावट दारू बनवून विकण्यात आली होती. तेव्हापासून हातभट्टीच्या दारूवर राज्यभरात बंदी घालण्यात आली. पण ज्याप्रमाणे बंदी असलेल्या अनेक बाबी जशा राजरोस सुरू असतात तशाच पद्धतीने हातभट्टीच्या दारूचा हा व्यवहारही  नियमित सुरू असल्याचे पंढरपूर शहर पोलिसांनी गेल्या काही दिवसात केलेल्या कारवाईत पुढे आले आहे.राज्याचे माजी गृहमंत्री स्व.  आर.आर. पाटील यांनी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी दारूची विक्री होत असल्याचे उघड होईल त्या पोलीस ठाण्याच्या जबाबदार अधिकाऱ्यावर व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन विधानसभेत दिले होते आणि विधानसभेतील आश्वासन हा शासनाचा आदेश समजला जातो. मात्र तरीही पंढरपूर शहर व तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ ची सर्रास टर उडविली जात असून आषाढी यात्रेपूर्वी एकादी कारवाई करून बातमी देऊन प्रसिद्धी मिळ्वणारे उत्पादन शुल्क विभाग मात्र वर्षभर मदमस्त असते. तर अनेकवेळा ग्रामीण भागातील धाबे व ड्राय डे दिवशी शहरी भागात विक्री होणारी देशी विदेशी दारू हि बनावट असते पण शासनाच्या २०११ च्या आदेशासाचा विसर पडलेला अन्न विभाग हा कारवाईत जप्त करण्यात आलेल्या दारूवर आपल्या प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्याबाबत सुस्त असतो हे दिसून आले आहे.
     मिथेनॉलमिश्रित स्पिरिट हे हातभट्टीच्या दारूसारखे लागते. याचा पुरेपूर फायदा उठवीत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परवान्याशिवाय विकण्याची बंदी असलेले मिथेनॉल सर्रास वापरले जाऊ लागले. मुंबईत हातभट्टीची दारू कमी प्रमाणात तयार होते. मात्र मागणी खूप असल्यामुळे आपल्या वाटेला आलेल्या हातभट्टीच्या दारूत भेसळ करण्यासाठी आवश्यक असलेल्या रसायनांचे ड्रमच्या ड्रम ३० ते ४० रुपयांना मिळू लागल्यानंतर हा धंदा बहरला.
 भंगारामधून चांगल्या स्थितीतील रिकाम्या बॉटल घेऊन त्यामधून खर्‍याच्या नावावर बनावट मद्याची विक्री होत असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या निदर्शनास आले आहे. नफेखारांच्या या फसवेगिरीवर लगाम कसण्यासाठी रिकाम्या बॉटलची विक्री करण्यापूर्वी त्यावर तसेच लेबलवर दोन ठिकाणी परमनंट मार्करद्वारे खूण करणे बंधनकारक करण्यात आले अनेकदा बनावट दारू विदेशी मद्याच्या बॉटलमधून बाजारात विक्रीसाठी येते. बॉटल सारख्याच असल्याने सहजपणे त्या खपून जातात. याला आवर घालण्यासाठी ‘मार्कर सिस्टीम’ सुरू केली. कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी बॉटलला ‘हाय सिक्युरिटी टॅग’ लावण्यात येऊ लागले पण हे सारे उपाय शंभर रुपये प्रति बॉटल नफा मिळवू पाहणाऱ्यांची निप्रभ ठरविले आहेत.
    गेल्या काही दिवसापासून पंढरपूर शहर पोलीस ठाणे अवैध दारू विक्री विरोधात कारवाई करू लागले आहे कदाचित जिल्ह्याचे पालकमंत्री हे उत्पादन शुल्क मंत्रीही असल्यामुळे हा बदल झाला असावा अशी चर्चाही होऊ लागली आहे पण खऱ्या अर्थाने बेकायदा व बनावट दारूसाठी मोठी बाजारपेठ असलेल्या तालुक्यातील धाबे व स्नॅक सेंटर कमी दारू विक्री केंदे या कारवाईतून मुक्त आहेत.
   एकीकडे अन्न विभागाने पोलीस कारवाईत जप्त करण्यात आलेल्या दारूची तपासणी करणे गरजेचे असताना व वार्षिक कारवाईची बातमी आषाढी यात्रेपूर्वी आली कि तालुक्यात सारे काही आलबेल असल्याचे चित्र दाखविणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाने याबाबत पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago