राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते उदघाटन

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते उदघाटन 

महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क,कामगार मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते पंढरपुरात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन येथील सरगम चौक येथे करण्यात आले.पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे गेल्या वीस वर्षाच्या कालावधीत पथकं संपर्क कार्यालय सुरु करण्यात आल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसचे समर्थक व कार्यकर्ते यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
     यावेळी बोलताना ना. दिलीप वळसे पाटील म्हणाले कि, आपल्या पक्षाचे अध्यक्ष आणि देशाचे नेते शरदचंद्र पवार यांनी सर्वसामान्य कष्टकरी वर्गाच्या,शोषित आणि वंचित घटकाच्या हितासाठी आपल्या पदांचा वापर करून न्याय मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतले तर शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अतिशय ठोस पावले उचलली.तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुयोग्य प्रशासनाच्या माध्यमातून सरकारच्या योजनांचा निर्णयाचा लाभ तळागाळात पोहोचवला.आणि आपल्या नेत्यांचे हेच कार्य डोळ्यासमोर ठेवून या संपर्क कार्यालयातून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन ना. वळसे पाटील यांनी केले.तर या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नासाठी कार्यकर्त्यानी ठोस प्रयत्न करावेत त्यासाठी आपले पूर्ण सहकार्य उपलब्ध असेल अशी ग्वाही आ.भारत भालके यांनी यावेळी बोलताना दिली.  
    यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले म्हणाले कि,शासनाच्या विविध योजना,शहर व तालुक्यातील विविध समस्या,प्रश्न याची सोडवणूक करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता अग्रेसर असून जनतेने आपल्या समस्या या माध्यमातून सोडवून घेण्यासाठी संपर्क करावा.
    यावेळी राष्ट्रवादी कॉगेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आ. दीपक साळूंखे पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील,माळशिरसचे उत्तम जानकर,विठ्ठल रोंगे,राष्ट्रवादी कॉग्रेसचे मोहोळ निरीक्षक श्रीकांत शिंदे,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे,रामचंद्र खडके, डॉ. अमर गोडसे,मनोज आदलिंगे,अनिल सप्ताळ,श्रेया भोसले,सुवर्णा बागल,साधना राऊत,विजय मोरे,आनंद कथळे,प्रवीण शिंदे सर, संतोष घाडगे(सरपंच),दिगविजय भोसले,सूरज भोसले,विक्रम भोसले,सागर कदम,विवेक शिंदे, कालिदास जवारे,सागर रोकडे,योगेश साळुंखे,विकास शेळके,पोपट शेळके आदी उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 week ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

2 weeks ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

2 weeks ago