माझ्या शब्दात शरद पवार
शरद पवार यांच्या जीवनप्रवासा बद्दल निबंध स्पर्धेचे आयोजन
माजी केंद्रीय कृषिमंत्री,राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच ८० व्या वर्षात पदार्पण केले आहे. सातत्याने ५२ वर्षे देशाच्या व राज्याच्या कायदेमंडळात कार्य केलेले ते एकमेव नेते आहेत.सर्वसामान्य जनतेला शरद पवार यांच्याविषयी काय वाटते हे, काय भावते आणि काय अपेक्षित आहे यासाठी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या सूचनेनुसार प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष गणेश गोडसे यांनी दिली आहे.
या बाबत अधीक माहिती देताना गणेश गोडसे म्हणाले कि,महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी निबंध स्पर्धा तर पत्रकार,स्तंभलेखक,शिक्षक. प्राध्यापक, सर्वसाधारण नागरिक यांच्यासाठी लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. निबंध स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १० हजार,द्वितीय ५ हजार तर तृतीय ३ हजार सन्मानचिन्ह तर लेख स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २० हजार रुपये ,द्वितीय पारितोषिक १५ हजार, तृतीय पारितोषिक १० हजार उत्तेजनार्थ पारितोषिक ५ हजार रुपये तसेच व सन्मानचिन्ह असे स्वरूप असणार आहे.आपले लेख अथवा निबंध जमा करण्याची अंतिम तारीख २०एप्रिल २०२० असणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी http//www.facbook.com/saheb/_80 यावर अथवा शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पत्ता ११८४ / ब ज्ञानेश्वर पादुका चौक,फर्गुयसन कॉलेज रोड, शिवाजीनगर पुणे -५ या पत्त्यावर अथवा info.saheb80@gmail.com या मेलवर संपर्क करावा.