पांडुरंग सह.कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार प्रदान
कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
श्री.पांडुरंग सहकारी साखर लि. श्रीपूर (ता.माळशिरस) या कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गळीत हंगाम सन २०१८-१९ मध्ये कारखान्याने ऊस ऊत्पादन वाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मध्य विभागातुन ‘उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते तसेच अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, हर्षवर्धन पाटील, कलाप्पा आवाडे, आ.रोहित पवार, महासंचालक शिवाजी देशमुख, साखर आयुक्त शेखर गायकवाड, संजय खताळ यांच्या उपस्थित स्मृतीचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करुन बेणेमळे व बेणेपुरवठा यावर कारखान्याने भर दिला असून कार्यक्षेत्रामध्ये यांत्रीकरणाचा स्विकार केला आहे. माती परिक्षणावर आधारीत रासायनिक खतांचा वापर ,प्रयोगशाळा सुरु केलेली आहे. कर्मचारी व शेतकरी प्रशिक्षणावर विशेष लक्ष, कार्यक्षेत्रात खोडवा व्यवस्थापन कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात आला आहे. हुमणी किडीच्या बाबत प्रचार व प्रसार करणेकरीता चित्ररथाचे माध्यमातुन जनजागृती करणे, जैविक कीड नियंत्रकांचा वापर करणे, उत्कृष्ट बायोखताची निर्मिती करुन शेतकऱ्यांना बांधपोच करणे, विविध ऊस विकास योजना राबविणेसाठी सातत्याने भरीव आर्थिक तरतुद करणे, ऊस उत्पादन वाढीसाठी ऊस भुषण पुरस्कार ऊस उत्पादकांना देणे या बाबींचा विचार करुन हा पुरस्कार देण्यात आला आहे.
राजेश टोपे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, हर्षवर्धन पाटील, कलाप्पा आवाडे, आ.रोहित पवार, महासंचालक शिवाजी देशमुख, साखर आयुक्त शेखर गायकवाड, संजय खताळ यांच्या उपस्थित स्मृतीचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…