महादेव कोळी समाजाच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढू- मुख्यमंत्री ठाकरे

महादेव कोळी समाजाच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढू- मुख्यमंत्री ठाकरे 

हरिदास समितीच्या शिफारशी लागू करा 

आ.रमेश पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

सोलापूर जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी महादेव कोळी समाजास अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यास गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या मागणीसाठी आतापर्यंत कोळी समाजातील अनेक संघटनानी उग्र आंदोलने,उपोषणे केली आहेत.मात्र तरीही अडवणूक होत असल्याने या समाजात प्रचंड असंतोष होता. याची दखल घेत यापूर्वीच्या महायुतीच्या सरकारने गतवर्षी निवृत्त न्यायमूर्ती पी.व्हि. हरिदास समितिची नियुक्ती केली होती. मात्र पुढे निवडणूक आचार संहिता व इतर कारणाने या समितीच्या शिफारशीच्या अमलबजावणी बाबत निर्णय होऊ शकला नव्हता.राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारने हरिदास समितीच्या शिफारशी लागू करून महादेव कोळी समाजास न्याय द्यावा अशी मागणी आ. रमेश पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली आहे.या बाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

सोलापूर जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रातील जात पडताळणी समित्यांकडून अनुसुचीत जमातीचे दाखले देण्याबाबत विलंबाबत व अडवणूकीबाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत होती.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव कोळी समाजाच्या दाखल्याचा प्रश्‍न सोेविण्याच्या हेतूने 2 नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैैठकीत रक्तच्या नात्यातील पुरावे सादर केल्यानंतर जात पडताळणी समित्यांनी अडवणूक करु नये असे आदेश दिले होते.तरीही जात पडताळणी समित्यांकडून तसेच स्थानिक महसुल अधिकार्‍यांकडून महादेव कोळी समाजातील नगरिकांची अडवणूक होत असल्यामुळे प्रचंड रोष व्यक्त होत होता.आ. रमेश पाटील यांनी हि बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तत्कालीन सरकारने महादेव कोळी समाजाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पी.व्ही हरिदास समितीची स्थापना केली होती.प्रधान सचिव विधी व न्याय विभाग,प्रधान सचिव अदिवासी विकास विभाग,प्रधान सचिव विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग,प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग,या समाजातील तज्ञ व्यक्ती,महासंचालक बार्टी पुणे,आयुक्त अदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता.

  यावेळी कोळी महासंघ युवाप्रदेशाध्यक्ष अँड चेतन पाटील,अकोला युवा अध्यक्ष सचिन रामाघरे,महेश ताडे,शांताराम दंदी,शंकर घुगरे, मंगेश ताडे,हरीश सुतार,गौरव तराळे आदी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

13 hours ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

2 days ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

7 days ago

मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आ समाधान आवताडे

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…

1 week ago

चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतुन माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

१२ ऑक्टोबर पासून ५ दिवस कृषी,कृषी उद्योग मार्गदर्शन,प्रदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन…

2 weeks ago