ताज्याघडामोडी

माढा तालुक्यात फक्त डॉ. रोंगे सरांचीच हवा | ज्ञानयात्रींच्या विचारांना शिक्षकांकडून हिरवा कंदील

कुर्डुवाडी- राहिलेल्या कमी अवधीत जास्त शिक्षकांशी संवाद साधता यावा आणि ज्ञानयात्री डॉ. रोंगे सरांचे विचार प्रत्येक शिक्षकांपर्यंत पोहचावे या उदात्त हेतूने त्यांच्या कार्यकर्त्यांसह डॉ. रोंगे सरांचे अख्खे कुटुंब कामाला लागले आहे. पुणे विभाग शिक्षक मतदार संघात एका जागेसाठी ३० जण उमेदवार रिंगणात असले तरी ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना माननारा मोठा शिक्षकवर्ग आहे. डॉ. रोंगे सरांचे पारदर्शी कार्यावर लक्ष आहे. आमदार होण्यापूर्वीच डॉ. रोंगे सरांनी शिक्षकांचे प्रश्न सोडविले आहेत म्हणूनच माढा तालुक्यात फक्त ज्ञानयात्री डॉ. बी.पी.रोंगे सरांचीच हवा असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी अर्थात श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य व खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे हे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे पहायला मिळत आहे. डॉ.रोंगे सर यांनी गेल्या वर्षापासून पुणे विभाग मतदार संघातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे व सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील शाळा व कॉलेज मधील पदाधिकारी व शिक्षकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. सर्वत्र डॉ. रोंगे सरांचे भव्य स्वागत केले जात आहे. या अनुषंगाने प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटीच्या रूपाने प्रचारात मात्र कमालीची आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट होत आहे. स्वेरीच्या स्थापनेपासून डॉ. रोंगे सरांची मुद्देसूद आणि व्यवस्थित मांडणी, प्रत्येक समस्येचा सुक्ष्म अभ्यास या धोरणांमुळे डॉ. रोंगे सरांच्या तंत्रशुद्ध अभ्यासाचा आता राज्याला फायदा होणार आहे, हे मात्र वाढत्या प्रतिसादावरून समजते. एकूणच डॉ. बी.पी.रोंगे सरांकडे शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज मंडळीचे लक्ष लागले आहे तसेच त्यांना पाचही जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांतील शिक्षकांचा भक्कम प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरापासून सुरू झालेल्या या काळात प्राचार्य डॉ. रोंगे सरांचे पाचही जिल्ह्यांत झंझावाती दौरे सुरु असून त्यांना सर्वत्र उस्फुर्तपणे प्रतिसाद लाभत आहे. मतदार नोंदणी पासून निवडणूकीच्या सर्व प्रक्रिया याबाबत डॉ. रोंगे सर प्रत्येक शाळेत, प्रत्येक शिक्षकांना, संस्थाचालकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेट देवून चर्चा करत आहेत. या चर्चांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये अनेक शिक्षक संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी डॉ. रोंगे सरांना पाठिंबा दर्शविला आहे. या भेटीमध्ये सर्व शाळांमध्ये प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी डॉ. रोंगे सरांचे कमालीचे स्वागत करत आहेत. मागील उमेदवारांनी फारसे काहीही केले नसल्याची भूमिका घेत आता डॉ. रोंगे सरांमुळे उत्साह वाढल्याचे दिसत आहे. एकूणच डॉ.रोंगे सर यांच्या स्वेरी, एसव्हीआयटी आणि स्वाईप या तिन्ही संस्थांना अल्पावधित मिळालेल्या यशामुळे शिक्षकांची अपेक्षा वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काल माढा तालुक्यातील जवळपास २५ शाळा महाविद्यालयांना भेटी देऊन डॉ. रोंगे सरांची असलेली भूमिका स्पष्ट केली.

डॉ. रोंगे सरांच्या वतीने त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रेमलता रोंगे यांनी गेल्या आठवड्यात भेटी गाठीवर लक्ष केंद्रित केले असून सर्वत्र प्रचंड प्रतिसाद असल्याचे जाणवते आहे. सौ. रोंगे यांनी काल कुर्डुवाडीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला, महात्मा ज्योतीबा फुले उच्च माध्यमिक व कला प्रशाला कुर्डुवाडी, लीड स्कूल कुर्डूवाडी, प्रगती पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज कुर्डू, शरद विद्यालय बारलोणी, प्रबोधनकार ठाकरे विद्यालय कव्हे, श्रीमान लक्ष्मणराव पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रोपळे, संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय भोगेवाडी, छत्रपती शिवाजी विद्यालय वडशिंगे, न्यू इंग्लिश स्कूल वडशिंगे, मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव, न्यू इंग्लिश स्कूल रिधोरे यासह इतर शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य करणाऱ्या ज्ञानयात्री डॉ. रोंगे सरांनी आपल्या अभ्यासाने आणि नियोजनात्मक धोरणामुळे प्रत्येक घटकाला यश मिळत आहे. या निवडणुकीच्या कारणांमुळे डॉ. रोंगे सरांच्या भेटींचे सर्वत्र स्वागत होत असून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यावली त्यांच्या समवेत अर्जुन खटके, भारत माने यांच्यासह डॉ.रोंगे सरांचे प्रेमी उपस्थित होते.

चौकट- आमदार होण्यापूर्वीच डॉ. बी.पी. रोंगे सरांनी सोलापूर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या पदोन्नतीनंतर तब्बल आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेला पदमान्यता व वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लावला आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा सेवा अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिले होते. त्या अनुषंगाने त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष साखरे यांच्या माध्यमातून प्राचार्य डॉ. बब्रुवाहन रोंगे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती, नियुक्ती व सेवा विषयक अनेक प्रकरणे सोडवली गेली आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे. या कारणांमुळे डॉ. रोंगे सरांच्या भेटींचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

इचलकरंजी परिसरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

डीकेटीई संस्थेच्या ४०० हून अधिक शिक्षकांचा मेळावा; कार्यकारी संचालक रवी आवाडे यांच्याकडून ठाम पाठिंबा इचलकरंजी…

4 hours ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना सांगली जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा सांगली-मिरज परिसरात प्रचार दौरा; शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद…

6 hours ago

स्वेरी फार्मसीमध्ये राष्ट्रीय औषधनिर्माण सप्ताह उत्साहात साजरा

संस्थापक डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम संपन्न पंढरपूर : गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री…

20 hours ago

रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय

ज्ञानयात्री डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा टेंभुर्णी: शिक्षकांचे प्रश्न समजून घेणे, त्यांचा…

2 days ago

बार्शी तालुक्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना भरघोस प्रतिसाद

बार्शी– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून पुणे विभाग शिक्षक…

3 days ago

दिल्ली उच्च न्यायालयाच्या नोंदींमुळे कथित इंडिया-कोमेसा ट्रेड कौन्सिल नियुक्त्या वादाच्या भोवऱ्यात

डॉ. आसिफ इक्बाल यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत अनेक धक्कादायक पैलूंची नोंद दिल्ली उच्च न्यायालयात…

3 days ago