Categories: Uncategorized

रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय

ज्ञानयात्री डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा

टेंभुर्णी: शिक्षकांचे प्रश्न समजून घेणे, त्यांचा अभ्यास करणे आणि ते मार्गी लावण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे, हीच प्रभावी नेतृत्वाची खरी ओळख असते. याच कार्यपद्धतीचा प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीतून आला आहे. पदोन्नतीनंतर तब्बल आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेला पदमान्यता व वेतनाचा प्रश्न श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या पुढाकाराने मार्गी लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणून डॉ. रोंगे सरांच्या कार्याची जिल्ह्यात चर्चा होत आहे.
आमदार होण्यापूर्वीच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी डॉ.बी.पी. रोंगे सरांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. विशेषतः रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमधील पदाधिकारी व शिक्षकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी दाखविलेली तत्परता, प्रशासकीय प्रक्रियेचा अभ्यास आणि पाठपुराव्याची भूमिका यामुळे शिक्षकवर्गाचे लक्ष त्यांच्या कार्याकडे वेधले गेले आहे. गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी अर्थात श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य तसेच खेड (ता. उत्तर सोलापूर) येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे हे गेल्या वर्षापासून पुणे विभागातील शिक्षकांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी सक्रिय आहेत. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना भेटी देत तेथील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य व संस्थाचालकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. शिक्षकांच्या प्रश्नांकडे केवळ आश्वासनांच्या दृष्टिकोनातून न पाहता, संबंधित प्रकरणाचा अभ्यास, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, योग्य प्रशासकीय मार्गाचा अवलंब आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा या माध्यमांतून प्रश्न सोडविण्याची त्यांची कार्यपद्धती विशेष चर्चेत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ठोस प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणून डॉ. रोंगे सरांकडे पाहिले जात आहे. दरम्यान, शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या या उपक्रमात डॉ. रोंगे सरांच्या पत्नी, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन व स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे यादेखील सक्रिय सहभाग घेत आहेत. विविध शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन त्या डॉ. रोंगे सरांच्या कार्यपद्धतीची, शिक्षकांच्या प्रश्नांबाबतच्या भूमिकेची आणि त्यांच्या प्रयत्नांची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. याच अनुषंगाने नुकत्याच माढा तालुक्यातील मोडनिंब व परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांना सौ. प्रेमलता रोंगे यांनी भेटी दिल्या. यामध्ये मारुतीराव हरीराव महाडिक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मोडनिंब, संजीवनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मोडनिंब, वसुंधरा इंग्लिश मीडियम स्कूल मोडनिंब, उमा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मोडनिंब, संगनबसवेश्वर शिवयोगी कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, मोडनिंब, नंदीकेश्वर हायस्कूल उपळाई, महाराणी ताराराणी कन्या प्रशाला उपळाई, मदर पब्लिक स्कूल माढा, महात्मा फुले विद्यालय वरवडे, न्यू इंग्लिश स्कूल आढेगाव आणि न्यू इंग्लिश स्कूल टाकळी या शाळा-महाविद्यालयांचा समावेश होता. या भेटीदरम्यान त्यांनी संबंधित संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिकांसोबत संवाद साधला. डॉ. रोंगे सरांची काम करण्याची पद्धत, प्रत्येक प्रश्नाचा अभ्यासपूर्ण विचार, प्रशासकीय प्रक्रियेची जाण, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्रश्न मार्गी लागेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. यावेळी महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य के. बी. होडगर यांनी डॉ. रोंगे सरांच्या कार्याविषयी विश्वास व्यक्त करताना सांगितले, ‘डॉ. बी.पी.रोंगे सरांच्या कार्यपद्धतीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील असून त्यांच्या पुढाकारामुळे आमचे प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.’ शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, शैक्षणिक क्षेत्रातील घटकांशी थेट संवाद साधणे आणि प्रशासकीय पातळीवर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे, या बाबींमुळे डॉ. बी. पी. रोंगे सरांचे नाव सध्या शिक्षकवर्गात चर्चेत आहे. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत सुरू असलेल्या भेटीगाठी आणि शिक्षकांशी साधला जाणारा संवाद यामुळे त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढताना दिसत आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण, प्रश्न सोडविण्याची कृतीशील भूमिका आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा या मुद्द्यांमुळे डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याकडे शिक्षकांचे लक्ष वेधले जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकवर्गातील या संवादाला महत्त्व प्राप्त झाले असून, शिक्षकांच्या प्रश्नांवर ठोस काम करणाऱ्या नेतृत्वाबाबतची अपेक्षा अधिक ठळक होत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

बार्शी तालुक्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना भरघोस प्रतिसाद

बार्शी– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून पुणे विभाग शिक्षक…

1 day ago

दिल्ली उच्च न्यायालयाच्या नोंदींमुळे कथित इंडिया-कोमेसा ट्रेड कौन्सिल नियुक्त्या वादाच्या भोवऱ्यात

डॉ. आसिफ इक्बाल यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत अनेक धक्कादायक पैलूंची नोंद दिल्ली उच्च न्यायालयात…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचा निकालाचा चढता आलेख कायम

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 days ago

पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न; नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज,…

1 week ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 month ago