पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी लिंक रोडवरील हॉटेल स्वराद्या येथे उत्साहात पार पडला. या बैठकीत तालुक्याच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांनी आपले तीन दिवसांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस पोलीस पाटील संघटनेचे राज्याध्यक्ष दिलीप आबा पाटील,राज्य प्रसिद्धीप्रमुख तोफिक शेख, सोलापूर जिल्हाध्यक्ष अॅड. नानासाहेब शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी आणि पंढरपूर तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी उपस्थित पोलीस पाटील बांधवांना संघटनेचे कार्य आणि प्रलंबित प्रश्नांबाबत मार्गदर्शन केले. बैठकीदरम्यान तालुक्यातील नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये पंढरपूर तालुकाध्यक्षपदी बाबासाहेब भाकरे, उपाध्यक्षपदी रामचंद्र कांबळे, सचिवपदी सतीश श्रीराम आणि कार्याध्यक्षपदी नारायण जाधव यांची निवड करण्यात आली. तसेच महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी प्राणी शरद मोरे व उपाध्यक्षपदी सुनिता कोरके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
दरम्यान, जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेताना राज्याध्यक्ष दिलीप आबा पाटील यांनी सामाजिक दायित्व म्हणून सर्व पोलीस पाटलांनी आपले तीन दिवसांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचे आवाहन केले. राज्य प्रसिद्धीप्रमुख तोफिक शेख यांनीही या भीषण परिस्थितीत प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून गावागावांतील पंचनामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी पोलीस पाटलांनी पुढाकार घेण्याचे आवाहनासहीत मानधन देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. या बैठकीत संघटनेच्या आगामी धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…