इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर. डॉ. मोहन देशपांडे
कोर्टी, पंढरपूर : “अभियंता हा केवळ तांत्रिक ज्ञान मिळवणारा व्यावसायिक नसून समाजासमोरील समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण, व्यवहार्य आणि शाश्वत उपाय शोधणारा ‘प्रॉब्लेम सॉल्व्हर’ असला पाहिजे,” असे प्रतिपादन इआर. डॉ. मोहन देशपांडे यांनी केले.
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. देशपांडे यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातील अभियंत्यांची भूमिका, झेन झी (Gen Z) विद्यार्थ्यांच्या अपेक्षा, आधुनिक शिक्षणपद्धती आणि कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (E&TC) विभागाला ‘बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी विकास, तांत्रिक व सहशैक्षणिक उपक्रम, नवोपक्रम तसेच विभागाच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार विभागातील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव ठरला. या पुरस्काराचे सर्व निकष डॉ.नामदेव सावंत,आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागाचे विभाग प्रमुख व आय क्यू एस सी कोऑर्डिनेटर यांनी अधोरेखित केले.
डिग्री(‘Degree’) पेक्षा लर्निंग एटीट्यूड (‘Learning Attitude’) महत्त्वाचा,आजच्या झेन जी (Gen Z) विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यावर समाधान न मानता Learning Attitude, Knowledge, Values आणि Positive Attitude यांचा विकास करणे आवश्यक आहे. बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीतही परिवर्तन होणे गरजेचे असून Experiential Pedagogy, Storytelling आणि Activity-Based Learning यांचा प्रभावी वापर विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला अधिक परिणामकारक बनवतो, असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले.
“We Engineers are Problem Solvers” हा संदेश देताना विद्यार्थ्यांनी आपल्या सभोवतालच्या समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण व व्यवहार्य उपाय विकसित करण्याची सवय लावून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
‘Fail’ म्हणजे शेवट नव्हे, पुढील संधी,डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी अपयश म्हणजे शेवट नसून पुढील यशाची संधी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, सातत्याने शिकत राहावे आणि आपल्या कल्पनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे धैर्य ठेवावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
एक उत्कृष्ट अभियंता घडण्यासाठी Head, Hands आणि Heart या तीन ‘H’चा समतोल आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Head म्हणजे ज्ञान व विचारशक्ती, Hands म्हणजे कौशल्य व प्रत्यक्ष कृती, तर Heart म्हणजे माणुसकी, संवेदनशीलता आणि मूल्ये. या तिन्हींचा समतोल साधणारा अभियंता समाजाच्या विकासात प्रभावी योगदान देऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी केवळ आकर्षक पॅकेज मिळविण्याला यशाचे अंतिम मापदंड न मानता प्रामाणिकपणा, चांगले वर्तन, सकारात्मक दृष्टिकोन, एकाग्रता, कौशल्य आणि समाजोपयोगी कार्य यांना प्राधान्य द्यावे. तंत्रज्ञानाचा उपयोग रोजगारनिर्मिती, नवोपक्रम आणि समाजातील समस्या सोडविण्यासाठी झाला पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला.
प्राचार्य व संचालक डॉ. कैलाश करांडे यांनी अभियंता दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, “आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात अभियंत्यांनी केवळ नोकरीच्या संधींच्या मागे न लागता ज्ञान, कौशल्य, नवोपक्रम आणि उद्योजकतेचा दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष जीवनातील समस्या सोडविण्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी केला पाहिजे.”
महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रात्यक्षिक शिक्षण, नवोपक्रम आणि उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करण्यासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर सातत्याने भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. ‘Think Big, Learn Continuously, Innovate and Implement’ हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि व्यावसायिक विकासाचा आधार ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उपप्राचार्य डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी यांनी अभियंता दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, “अभियांत्रिकी शिक्षणाचा खरा उद्देश केवळ पदवी संपादन करणे नसून विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक ज्ञानासोबत समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता, टीमवर्क, नेतृत्वगुण आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा आहे.”
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवत नवीन कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे, नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आणि आपल्या ज्ञानाचा समाजाच्या हितासाठी उपयोग करणे ही प्रत्येक अभियंत्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
E&TC विभागाला प्राप्त झालेला ‘Best Department Award’ हा विभागाच्या गुणवत्तापूर्ण कार्याचा आणि शिक्षक-विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा गौरव असून, हा पुरस्कार भविष्यात अधिक उत्कृष्ट शैक्षणिक, तांत्रिक आणि नवोपक्रमात्मक उपक्रम राबविण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास डॉ. करांडे ,डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास प्राचार्य व संचालक डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, IQAC Coordinator व Head, AI & DS Department डॉ. नामदेव सावंत, E&TC विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला मिळालेल्या ‘Best Department Award’ बद्दल विभागातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले. अभियंता दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना समस्या ओळखा, समाधान शोधा आणि नवकल्पना प्रत्यक्षात आणा हा प्रेरणादायी संदेश मिळाला.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…