ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन. एम तृतीय वर्ष चा निकाल जाहीर झाला असून, श्री. पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलीत कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयातील जी. एन. एम नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या निकालात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे त्यामुळे महाविद्यालयाचे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या निकालात सर्व विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन करून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. जी. एन. एम नर्सिंग च्या अंतिम वर्षाचा निकाल ८१ टक्के लागला असून. अंतिम वर्षातील पुजा तानाजी जाधव ८५.२ टक्के गुण घेवून प्रथम, तर प्रतीक्षा लक्ष्मण सोनवले या ८२.६० टक्के गुण घेवून द्वितीय क्रमांकावर आहेत तर पवार स्नेहा भारत व कैलास शंकर सरवदे यांनी ८१.६० टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. एवढे घवघवीत यश मिळविल्याबद्दल संस्थेचे विश्वस्त रोहन परिचारक, कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग प्राचार्य श्री. गुरुराज कुलकर्णी , कर्मयोगी इंजिनीअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील , कर्मयोगी पॉलीटेकनिकचे प्राचार्य श्री. डॉ. ए. बी. कणसे , रजिस्ट्रार गणेश वाळके यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये व्याख्यान..

संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र. पंढरपूर : श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या सहाव्या…

3 weeks ago