ताज्याघडामोडी

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हच्या तयारीच्या दृष्टीने १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास करांडे यांनी दिली. या प्रशिक्षणाचा सुमारे १०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक श्री. अनबरसु यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामध्ये तार्किक विचारशक्ती, भाषिक कौशल्य, समस्या निराकरण कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, गणितीय अभियोग्यता तसेच कॅम्पस प्लेसमेंट परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या प्रश्नांचा सराव करून घेण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्लेसमेंट परीक्षेच्या पद्धतीनुसार सराव प्रश्न व मार्गदर्शन देण्यात आल्याने आगामी भरती प्रक्रियेसाठी त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत झाली.

विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानाबरोबरच रोजगारक्षम कौशल्ये विकसित करण्यावर महाविद्यालयाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाकडून सातत्याने भर दिला जात आहे. उद्योगांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन अभियोग्यता, बौद्धिक क्षमता, संवाद कौशल्ये, तांत्रिक कौशल्ये, मुलाखत कौशल्ये,गटचर्चा कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास कौशल्ये यांसारख्या विविध कौशल्यविकास उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास तसेच रोजगाराच्या अधिकाधिक संधी प्राप्त करण्यास निश्चितच मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांना सक्षम बनविण्यासाठी महाविद्यालयाचा ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

7 hours ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

15 hours ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 day ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 days ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

4 days ago

माढा तालुक्यात फक्त डॉ. रोंगे सरांचीच हवा | ज्ञानयात्रींच्या विचारांना शिक्षकांकडून हिरवा कंदील

कुर्डुवाडी- राहिलेल्या कमी अवधीत जास्त शिक्षकांशी संवाद साधता यावा आणि ज्ञानयात्री डॉ. रोंगे सरांचे विचार…

5 days ago