ताज्याघडामोडी

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट लेवल टेक्निकल फेस्टिवल “स्पेक्ट्रम २के२६”चे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कुंडलिक माळी यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. यावेळी बोलताना डॉ. माळी यांनी विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानासोबतच नाविन्यपूर्ण विचार, कौशल्य विकास आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले.

सर्व अभियांत्रिकी विभागांमधील विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य विकसित करण्याच्या हेतूने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाअंतर्गत एकूण २० तांत्रिक इव्हेंट्सचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या तांत्रिक कौशल्यांचे प्रदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आणि मा. उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राप्ती खलगे आणि साक्षी हलनवार यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापिका सोनाली गोडसे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांचे समन्वयक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

6 hours ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

14 hours ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 day ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 days ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

4 days ago

माढा तालुक्यात फक्त डॉ. रोंगे सरांचीच हवा | ज्ञानयात्रींच्या विचारांना शिक्षकांकडून हिरवा कंदील

कुर्डुवाडी- राहिलेल्या कमी अवधीत जास्त शिक्षकांशी संवाद साधता यावा आणि ज्ञानयात्री डॉ. रोंगे सरांचे विचार…

5 days ago