माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन, माढा संचलित ‘कर्मयोगी आमदार बबनदादा शिंदे नेत्रालय’च्या वतीने एका भव्य मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माढा बस स्थानका शेजारील कर्मयोगी आमदार बबनदादा शिंदे नेत्रालयात हे शिबिर संपन्न होणार आहे. हे तीनदिवसीय शिबिर दिनांक २९, ३० व ३१ ऑगस्ट २०२६ दरम्यान पार पडत असून, याचा शुभारंभ शनिवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता संपन्न होत आहे.यावेळी शुभारंभ: मा. नामदार बाबासाहेब पाटील (सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते.तर कार्यक्रम अध्यक्ष:धनीजीराव (तात्या) साठे (माजी आमदार, माढा) तसेच प्रमुख उपस्थिती: म्हणून विनायकराव पाटील (माजी आमदार, माढा), मा.आ. संजयमामा शिंदे (माढा-करमाळा विधानसभा), प्रा. शिवाजीराव सावंत (सर) (भाजप नेते), रणजितसिंह (भैय्या) शिंदे (चेअरमन, जिल्हा दूध संघ सोलापूर), पंडित (काका) देशमुख़ (सभापती, माढा), डॉ. वर्षा डोईफोडे (जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर), डॉ. ऋत्विक जयकर (अधिष्ठाता, डॉ.व्ही.एम.मेडिकल कॉलेज, सोलापूर), डॉ. सतीश कोपरवाड (जिल्हा आरोग्य अधिकारी, सोलापूर), मुकुंद पवार (जिल्हा उपनिबंधक, सोलापूर), जयश्री आव्हाड (प्रांताधिकारी, कुर्डूवाडी), संजय भोसले (तहसीलदार, माढा) आणि महेश सुळे (गटविकास अधिकारी, कुर्डूवाडी) हे उपस्थित राहणार आहेत.या सामाजिक उपक्रमाचे आयोजन अशोकशेठ लुनावत (संस्थापक-अध्यक्ष, संकल्प फाऊंडेशन, माढा) आणि विक्रमसिंह (दादा) शिंदे (माजी सभापती, माढा) यांनी केले आहे. या शिबिरास संकल्प फाऊंडेशन माढा, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद आरोग्य विभाग सोलापूर, जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर आणि जिल्हा अंधत्व निवारण समिती सोलापूर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. माढ्यातील नागरिकांनी या मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…
संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र. पंढरपूर : श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या सहाव्या…
माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नांतून १५ कोटींच्या सिव्हेज पंपिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर पंढरपूर:…
नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले…
11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व.…