ताज्याघडामोडी

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. वीर फकिरा फाउंडेशनच्या वतीने तुळशी ता. माढा येथे दिनांक. 9 ऑगस्ट 2026 रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा , पोलिस गौरव पुरस्कार सोहळा व डॉक्टर गौरव पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

‘”लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना” या विषयावर ॲड. संदिप कागदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात होते. ह्या वेळी त्यांनी उपस्थिताना प्रभावी मार्गदर्शन केले.
सदर व्याख्याना मध्ये भारतीय राज्यघटना, मूलभूत अधिकार, अभिव्यक्ती स्वतंत्र, युवकांची भूमिका तसेच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य ह्यावर मार्गदर्शन केले.

ॲड. संदिप कागदे यांचे शिक्षण बी. एस. सी., एल. एल. एम., सेट, नेट. (B.Sc.,L.L.M.,S.E.T., N.E.T) आहे. त्यांना विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल व महत्वपूर्ण योगदान दिल्या बद्दल विश्वभूषण डॉ. बाबा साहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर च्या वतीने “विधीज्ञ राज्यस्तरीय पुरस्कार” देउन गौरवण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. समाजकल्याण सभापती शिवाजी नाना कांबळे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये तुळशीचे सरपंच डॉ. शरद मोरे, उपसरपंच दिगंबर माळी ,वीर फकिरा फाउंडेशनचे अध्यक्ष शरद लोखंडे , कवी व लेखक किरण निकम यांच्या सह सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवर
विद्यार्थी, युवक, नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.सदर कार्यक्रमांस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे आयोजन लोकआधार फाउंडेशनचे अध्यक्ष कवी-लेखक किरण निकम यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

5 hours ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

13 hours ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 day ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 days ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

4 days ago

माढा तालुक्यात फक्त डॉ. रोंगे सरांचीच हवा | ज्ञानयात्रींच्या विचारांना शिक्षकांकडून हिरवा कंदील

कुर्डुवाडी- राहिलेल्या कमी अवधीत जास्त शिक्षकांशी संवाद साधता यावा आणि ज्ञानयात्री डॉ. रोंगे सरांचे विचार…

5 days ago