ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये व्याख्यान..

संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र.

पंढरपूर : श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथे प्रसिद्ध व्याख्याते श्री. वसंत हंकारे यांच्या ‘संघर्षातून यशाकडे’ या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी कर्मयोगी पॉलिटेक्निक इमारतीत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमा पूजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. कर्मयोगी इन्स्टिट्यूट चे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

यावेळी श्री. वसंत हंकारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जीवनातील संघर्ष, अडचणी, अपयश, जिद्द आणि यशाचा प्रवास याबरोबरच आई-वडिलांचे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी असलेले योगदान आणि त्याग यांची जाणीव करून दिली.

‘बाप म्हणजे केवळ घरातील कर्ता पुरुष नसून, आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी स्वतःची अनेक स्वप्ने बाजूला ठेवणारा संघर्षशील आधार असतो,’ या भावनेतून त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या पालकांकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा संदेश दिला. मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी आणि यशासाठी पालक करत असलेल्या कष्टांची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी, तसेच त्यांच्या त्यागाचे सार्थक आपल्या कर्तृत्वातून करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विविध अनुभव, प्रसंग आणि भावनिक उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी आई-वडिलांचे कष्ट, त्यांची स्वप्ने आणि मुलांकडून असलेल्या अपेक्षा विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडल्या. आई वडिल आपल्या पाल्यांप्रती करीत असलेल्या अनेक त्यागाची उदाहरणे देऊन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या मनाला भावनिक स्पर्श केला.
विद्यार्थ्यांना जीवनातील संघर्षाचा सामना करण्याची प्रेरणा देतानाच पालकांच्या त्यागाची जाणीव करून द्यावी आणि आपल्या कर्तृत्वातून त्यांना अभिमान वाटेल असे जीवन जगण्याचा संदेश या व्याख्यानातून देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया व व्यसनाधीनता यांच्या आहारी न जाता आपल्या आयुष्यातील ध्येय साध्य करावे असा मोलाचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त रोहन परिचारक यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व त्यांचे संस्कार दृढ होण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके तसेच कर्मयोगी शिक्षण संकुलातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘संघर्षातून यशाकडे’ हा संदेश देणारे आणि ‘बाप समजावून घेताना’ पालकांच्या त्यागाची जाणीव करून देणारे हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय व प्रेरणादायी ठरले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सुशील कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचा निकालाचा चढता आलेख कायम

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

22 hours ago

पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न; नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज,…

7 days ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 month ago