ताज्याघडामोडी

ऐतिहासिक यमाई तलाव होणार प्रदूषणमुक्त !

​माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नांतून १५ कोटींच्या सिव्हेज पंपिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर

पंढरपूर:
पंढरपूर शहराचे सौंदर्य आणि ऐतिहासिक यमाई तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नांतून १५ कोटी रुपये निधीतून साकारणाऱ्या ९.९ दशलक्ष लिटर (द.ल.ली.) क्षमतेच्या सिव्हेज पंपिंग स्टेशनच्या कामाची आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात आली. पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत ‘पंढरपूर शहर भुयारी गटार योजना – टप्पा क्र. ४’ (एकूण मूळ किंमत १२२ कोटी रुपये) अंतर्गत यमाई तलाव परिसरात हे अत्याधुनिक सिव्हेज पंपिंग स्टेशन उभारण्यात येत आहे.
​यमाई तलाव परिसरात नागरिकांसाठी आकर्षक ‘यमाई वॉकिंग ट्रॅक’ उभारण्यात आला असून येथे रोज सकाळी व संध्याकाळी हजारो नागरिक फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी येतात. परंतु, तलावाच्या दक्षिण बाजूला असलेल्या टाकळी ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून तेथील नैसर्गिक उतार तलावाच्या दिशेने असल्याने घरातील सांडपाणी थेट तलावात मिसळत होते. यामुळे तलावातील पाणी दूषित होऊन दुर्गंधी सुटणे, जलचरांचा मृत्यू होणे आणि परिसरातील पर्यावरण दूषित होण्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी शासनस्तरावर विशेष पाठपुरावा करून तब्बल १५ कोटींचा निधी मंजूर करून आणला.
​या प्रकल्पामुळे लक्ष्मी टाकळी परिसरातील रहिवाशांच्या ड्रेनेजच्या (सांडपाण्याच्या) पाण्याची कायमस्वरूपी व उत्तम सोय होणार आहे. या पंपिंग स्टेशनमध्ये टाकळी ग्रामपंचायतीचे सांडपाणी, पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील माळी वस्ती, राऊत मळा तसेच मलपे नाला येथील सिव्हेज पंपिंग स्टेशनचे सांडपाणी एका मोठ्या विहिरीमध्ये जमा केले जाईल. त्यानंतर हे सांडपाणी योजनेअंतर्गत प्रस्तावित १३ द.ल.ली. क्षमतेच्या ‘सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट’मध्ये (STP) पंपिंग करून गोपाळपूर येथील मुख्य ड्रेनेज लाईनला जोडण्यात येईल व त्यावर आवश्यक प्रक्रिया केली जाईल. हे काम पूर्ण होताच यमाई तलावामध्ये येणारे सांडपाणी पूर्णपणे बंद होणार असून तलावाचे प्रदूषण कायमचे रोखले जाईल. सध्या या कामाचा वेग अत्यंत समाधानकारक असून हे काम वेगाने प्रगतीपथावर आहे व लवकरच पूर्ण होऊन जनतेच्या सेवेत समर्पित केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
​या पाहणी प्रसंगी उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक लक्ष्मणराव शिरसट, गट नेते भागवत बडवे, नगरसेवक अमोल डोके, ॲड. सुनिल वाळुजकर, युवक नेते प्रणव परिचारक, पंचायत समिती सभापती श्री. शुभम आगावणे, लक्ष्मी टाकळीचे सरपंच औदुंबर ढोणे, ग्रामपंचायत सदस्य,सागर कारंडे, नगरसेवक सौरभ थिटे, शरद माने, धर्मराज घोडके,अशोक शिंदे गणेश शिंदे,ऋषिकेश भालेराव, बबन येळे,उमेश सर्वगोड,सागर सोनवणे, विजय देशपांडे, औदुंबर पोतदार यांच्यासह इतर सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

1 month ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago