ताज्याघडामोडी

स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिर : प्रणव परिचारक

11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर

कर्मयोगी श्रद्धेय स्व. सुधाकरपंत परिचारक (मालक) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया (लेन्ससहित) तसेच सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर तब्बल दहा दिवस चालणार असल्याची माहिती पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली.

पांडुरंग परिवार युवक आघाडी व प्रणव परिवार युवा मंच, पंढरपूर यांच्या वतीने हे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले असून, शंकरराव साळवे नेत्र रुग्णालय, सोलापूर (एच. व्ही. देसाई आय इन्स्टिट्यूटचा प्रकल्प)यांचे विशेष सहकार्यातून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ज्या मदतीने हे शिबिर घेतले जाणार आहेत.

या आरोग्य उपक्रमांतर्गत ११ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत तालुक्यातील विविध गावांमध्ये सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच तज्ज्ञांकडून आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. यासाठी सोलापूर आणि पुणे येथील डॉक्टर उपस्थित राहतील. महत्वाचे म्हणजे या शिबिराच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून मोतीबिंदू मुक्त डोळस पंढरपूर तालुका करण्याचा संकल्प प्रणव परिचारक यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

नेत्र तपासणी शिबिराची सुरुवात ही ११ ऑगस्ट रोजी तुंगत पासून होईल. तुंगत नंतर पुढे , १२ ऑगस्ट रोजी गादेगाव , १३ ऑगस्ट रोजी खर्डी, १४ ऑगस्ट रोजी उंबरे-पागे आणि १६ ऑगस्ट रोजी रांजणी येथील आरोग्य केंद्रात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी कासेगाव , १९ ऑगस्ट रोजी रोपळे, २० ऑगस्ट रोजी पुळुज, २१ ऑगस्ट रोजी करकंब ग्रामीण रुग्णालय आणि २२ ऑगस्ट रोजी भाळवणी येथे आरोग्य तपासणी शिबिर होऊन समारोप होणार आहे.

या शिबिरामध्ये नागरिकांची नेत्र तपासणी करून मोतीबिंदू आढळल्यास पुढील मोफत शस्त्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अद्ययावत अशा सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना मोफत घेऊन शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे. यासोबतच विविध आजारांचे मार्गदर्शनही तज्ञ डॉक्टरांकडून होईल.

ग्रामीण भागातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रणव परिचारक यांच्या वतीने करण्यात आले आहे. स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या सामाजिक कार्याच्या स्मृती जपत आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 week ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

4 weeks ago