ताज्याघडामोडी

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथे विद्युत अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी पालक मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे आणि उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, पालक-शिक्षक संवाद अधिक प्रभावी करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सहभाग वाढविणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

या कार्यक्रमास ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. एस. डी. काटेकर, विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख, आय. ई. ई. ई. वरिष्ठ सदस्य व आय. ई. ई. ई. स्टुडंट ब्रँच समुपदेशक डॉ. के. शिवशंकर, पालक प्रतिनिधी श्रीमती अनिता कदम, विभागातील सर्व प्राध्यापक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. उपस्थित पालकांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी पालक प्रतिनिधी श्रीमती अनिता कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. एस. डी. कटेकर यांनी विद्यार्थ्यांच्या करिअर विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानासोबतच व्यावसायिक कौशल्ये, संवाद कौशल्ये आणि उद्योगाभिमुख कौशल्यांचा विकास करण्यावर भर द्यावा, असे सांगितले. तसेच प्लेसमेंट, इंटर्नशिप आणि करिअरच्या विविध संधींचा विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी पालक व विद्यार्थ्यांना केले.

यानंतर डॉ. के. शिवशंकर, विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख, आय. ई. ई. ई. वरिष्ठ सदस्य व आय. ई. ई. ई. स्टुडंट ब्रँच समुपदेशक यांनी प्रास्ताविकातून विभागाच्या शैक्षणिक उपक्रमांचा, प्रयोगशाळा सुविधांचा, उद्योगभेटी, तांत्रिक स्पर्धा, इंटर्नशिप, प्लेसमेंट उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा पालकांसमोर सादर केला. विभागामार्फत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगाभिमुख कौशल्ये आणि विविध मूल्यवर्धित प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या संधींची माहितीही यावेळी देण्यात आली.

बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, अंतर्गत मूल्यमापन, सेमिस्टर परीक्षेची तयारी, उपस्थिती, करिअर मार्गदर्शन, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, उद्योजकता, इंटर्नशिप आणि प्लेसमेंट यासंदर्भात पालकांना सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी विविध सूचना व अपेक्षा व्यक्त केल्या. यामध्ये उद्योगाभिमुख प्रशिक्षण, संवाद कौशल्य विकास, अधिक इंटर्नशिपच्या संधी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच उद्योजकतेशी संबंधित उपक्रम वाढविण्याबाबत सूचना करण्यात आल्या.

यानंतर पालक व शिक्षक यांच्यात वैयक्तिक संवादाचे सत्र आयोजित करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक कामगिरी, उपस्थिती, वर्तन, प्रकल्प कार्य, अंतर्गत गुण आणि करिअर नियोजन याबाबत संबंधित शिक्षक-पालक यांच्यात सविस्तर चर्चा झाली. पालकांनी विभागाच्या शैक्षणिक वातावरणाबद्दल समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.

पालक प्रतिनिधी श्रीमती अनिता कदम यांनी पालकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक-शिक्षक सहकार्य अधिक दृढ करण्याचे महत्त्व त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागातील प्राध्यापकांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती अंजली ए. चांदणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्युत अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 week ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

4 weeks ago