पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवी पेठ भाजी मंडई परिसरात आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. प्राणिता भगीरथ भालके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन भाजी विक्रेत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विक्रेत्यांच्या अडचणी, दैनंदिन समस्या तसेच मंडई परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची माहिती जाणून घेतली.
पंढरपूर शहरातील भदुले चौक येथील भाजी मंडई परिसरात दररोज मोठ्या संख्येने नागरिक भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे या परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज व्यवस्था, रस्ते, नाली व्यवस्था, पार्किंग, वाहतूक नियोजन तसेच विक्रेत्यांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांबाबत नगराध्यक्षा डॉ. प्राणिताताई भालके यांनी विक्रेत्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी भाजी विक्रेत्यांनी आपल्या दैनंदिन अडचणी नगराध्यक्षांसमोर मांडल्या. भाजी विक्री करताना येणाऱ्या विविध समस्या, मंडईतील स्वच्छता व इतर नागरी सुविधांबाबत त्यांनी आपल्या सूचना दिल्या. नगराध्यक्षा डॉ. प्राणिताताई भालके यांनी विक्रेत्यांचे प्रश्न प्रत्यक्ष जागेवर जाऊन समजून घेत त्यांच्याशी संवाद साधला.
“भाजी विक्रेते हे शहराच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा घटक आहेत. त्यांच्या व्यवसायाला सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि नागरिकांनाही स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज मंडई परिसर मिळाला पाहिजे. त्यामुळे विक्रेत्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या टप्प्याटप्प्याने सोडविण्यासाठी नगर परिषद प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल,” असे नगराध्यक्षा डॉ. प्राणिताताई भगीरथ भालके यांनी यावेळी सांगितले.
मंडई परिसराची पाहणी करताना स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच परिसरातील नागरिक व व्यापारी यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी आवश्यक नियोजन करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली. नगराध्यक्षांनी स्वतः मंडई परिसरात येऊन भाजी विक्रेत्यांशी संवाद साधल्याने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले.
पंढरपूर शहरातील सर्व घटकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे, या भूमिकेतून नगराध्यक्षा डॉ. प्राणिताताई भगीरथ भालके यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…