ताज्याघडामोडी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

निती आयोगाची जिल्हा स्तरीय समन्वय व आढावा बैठक संपन्न.

सोलापूर- आकांक्षित तालुक्यातील 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा अशा सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या.
जिल्हा परिषद अंतर्गत निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तालुका स्तरावरील समन्वय व आढावा बैठक आज मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली घेणेत आली.
या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सुर्यकांत भुजबळ गटविकास अधिकारी शंकर कवितके अक्कलकोट, गटविकास अधिकारी अमित कदम करमाळा , सहगटविकास अधिकारी वसंत फुले, सांगोला तसेच जिल्हा स्तरीय संबधित विषयांचे खाते प्रमुख आणि तालुका स्तरावरील सर्व विभागप्रमुख आरोग्य, महिला व बाल विकास, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, ग्रामविकास तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी व , तालुका फेलो कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत सिईओ कुश जैन यांनी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत विविध निर्देशांकांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी व पर्यावरण, पायाभूत सुविधा तसेच सामाजिक विकास या क्षेत्रांतील कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.
देशातील सर्वाधिक मागासलेल्या 513 व महाराष्ट्रातील 27 तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाने आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरू केला असून, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट करमाळा व सांगोला 03 तालुक्याचा समावेश आहे.
निती आयोगाच्या Ranking मध्ये अक्कलकोट राज्यामध्ये (03) तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच सांगोला प्रगतीपथावर आहे. सदर कार्यक्रमामध्ये आरोग्य, महिला व बालकल्याण, शिक्षण, कृषी, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासाशी संबंधित निर्देशांकांवर विशेष भर देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांसाठी 38 निर्देशांकांच्या आधारे नियमित आढावा घेतला जात असून, या बैठकीत प्रत्येक विभागाच्या कामगिरीचे सादरीकरण करण्यात आले. प्रलंबित बाबी तातडीने पूर्ण करून शासनाने निर्धारित केलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून आकांक्षित तालुका कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्तपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

चौकट घेणे

निती आयोगाचे रॅंकींग मध्ये अक्कलकोट राज्यात ३ रा
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट करमाळा व सांगोला 03 तालुक्याचा समावेश आहे. निती आयोगाच्या रॅंकींग मध्ये अक्कलकोट राज्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच सांगोला प्रगतीपथावर आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 week ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

4 weeks ago