ताज्याघडामोडी

अजितदादांच्या जयंतीनिमित्त अजितदादा सुकन्या योजना राबविणार

लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार – राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम

लोकनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 68 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम हाती घेतला आहे. 22 जुलै 2026 या अजितदादांच्या जयंतीदिनी पंढरपूर शहरातील उपजिल्हा रूग्णालय व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 22 जुलै 2026 रोजी जन्मणाऱ्या 11 लहान मुलींच्या नावे प्रत्येकी 22 हजार रूपयांची ठेव अजितदादा सुकन्या योजना (ठेव रक्कम) ठेवणार असून ती त्यांच्या जयंती दिनी वेळेस ठेवल्यानंतर त्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस ती रक्कम काढता येणार आहे त्यामुळे त्या मुलींच्या कुटूंबियांना आर्थिक आधार मिळणार आहे. त्याचबरोबर लोकनेते अजितदादांचे सोलापूर जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे नाते होते त्यांच्या स्मृती जपण्यासाठी यावर्षीपासून प्रत्येक वर्षी सोलापूर जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका नेत्यास लोकनेता पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. अजितदादा सुकन्या योजनेमध्ये नाव नोंदविलेल्या मुलींच्या पालकांना त्याची पावती राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याहस्ते देण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी दिली.

सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष मुहम्मद उस्ताद , युवक शहराध्यक्ष अमोल परबतराव, सारंग महामुनी, प्रदीप तांदळे, माऊली कुंभार हे परिश्रम घेत आहेत. अजितदादा पवार यांच्या कार्याचा आलेख महाराष्ट्राच्या राजकारणात सुवर्ण अक्षराने कोरलेला आहे. त्यांच्या आठवणी महाराष्ट्र अजूनही विसरलेला आहे. दादांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. अजितदादांच्या आठवणीत अजितदादा सुकन्या योजना राबविणार असून त्या माध्यमातून मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे, तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ या संकल्पनेला बळकटी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आठवणीत राहील असा समाजोपयोगी कार्यक्रम करण्याचा हा प्रयत्न असून अशा सामाजिक उपक्रमांमुळे मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक संदेश समाजात जाईल, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये व्याख्यान..

संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र. पंढरपूर : श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या सहाव्या…

3 weeks ago