ताज्याघडामोडी

स्थापत्य अभियांत्रिकी विभागात व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम उत्साहात संपन्न

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर घालण्यासाठी विविध विषयांवर व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सर्व्हे व इंजिनिअरिंग जिओलॉजी, तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी काँक्रीट मिक्स डिझाईन व स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंग, तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी युज ऑफ सायटेशन फॉर रिसर्च आणि रेवीट या विषयांवरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन साधने आणि उद्योगाभिमुख कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमासाठी विविध विषयांचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. चंद्रकांत देशमुख यांनी सर्व्हे, प्रा. मिलिंद तोंडसे यांनी इंजिनिअरिंग जिओलॉजी, प्रा. अजित करांडे यांनी काँक्रीट मिक्स डिझाईन, प्रा. अमोल कांबळे यांनी स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंग, प्रा. गणेश लकडे यांनी  युज ऑफ सायटेशन फॉर रिसर्च तर श्री. विक्रम वावरे यांनी रेवीट या विषयांवर प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन पद्धती आणि कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांचा लाभ घेऊन उद्योग व संशोधन क्षेत्रातील आव्हानांसाठी स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये व्याख्यान..

संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र. पंढरपूर : श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या सहाव्या…

3 weeks ago