ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या दोन विदयार्थ्यांची स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड वार्षिक ५ लाख पॅकेजची नोकरी

पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेला सौरभ गुलाब जरे आणि प्रणव शरद हेंबाडे यांची स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असून त्यांना वार्षिक ५ लाखाचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती मेकॅनिकल विभाागाचे विभाग प्रमुख डॉ. शाम कुलकर्णी यांनी दिली.

स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड ही मुंबई, भारत येथे मुख्यालय असलेली जगातील एक आघाडीची इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. १९२७ मध्ये एक छोटी इंजिनिअरिंग फर्म म्हणून सुरू झालेल्या या कंपनीचे रूपांतर आता शापूरजी पालनजी ग्रुप आणि खुर्शेद दारूवाला यांच्या नेतृत्वाखाली एका मोठ्या बहुराष्ट्रीय इन्फ्रास्ट्रक्चर आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा समूहात झाले आहे.

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे विद्यार्थ्यांच्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी अत्यंत पद्धतशीर आणि प्रभावी उपक्रम राबवले जातात. यामध्ये प्रामुख्याने ‘स्टुडंट ट्रेनिंग प्रोग्राम’ अंतर्गत पहिल्या वर्षापासूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर काम केले जाते. प्लेसमेंट सेलद्वारे विद्यार्थ्यांसाठी नियमित अ‍ॅप्टिट्युड आणि रिझनिंग टेस्ट, मॉक इंटरव्ह्यू, र्व्हच्यूअल कॅम्पस डाइव्ह आणि ग्रुप डिस्कशन यांचे आयोजन केले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. यासोबतच, कोडिंग बूटकॅम्प्स, तांत्रिक कार्यशाळा आणि ‘रुबिकॉन’, महिंद्रा नांदी फाऊंडेशन, जीटीटी यांसारख्या कंपन्यांच्या सहकार्याने सॉफ्ट स्किल्सचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. जागतिक स्तरावर संधी मिळावी म्हणून कॉलेजमध्ये पहिल्या वर्षापासूनच जपानी भाषेचे विशेष वर्ग चालवले जातात. या सर्वसमावेशक ट्रेनिंग आणि सेंट्रल प्लेसमेंट सेलच्या भक्कम पाठिंब्यामुळे दरवर्षी १५० पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांमध्ये पंढरपूर सिंहगडचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर नोकरी मिळवतात.

अशा या कंपनीत सौरभ जरे आणि प्रणव हेंबाडे यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये व्याख्यान..

संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र. पंढरपूर : श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या सहाव्या…

3 weeks ago