ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन शाळेचे इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेतील विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड (Indian Talent Olympiad) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या स्पर्धेत इयत्ता पहिली मधील विद्यार्थिनी आरोही रोहित शहा हिने इंग्रजी विषयात राज्यात तृतीय क्रमांक मिळवला, तसेच इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी सान्वी प्रमोद क्षीरसागर हिने गणित विषयात राज्यात चतुर्थ क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.

याशिवाय शाळेतील युग गुंड इयत्ता पहिली (गणित),राजवर्धन पाटील इयत्ता तिसरी (Logical Reasoning)
आयान मुलाणी इयत्ता सातवी (गणित)
बुशरा शेख (गणित)
स्वरा गुरव ( जनरल नॉलेज) या पाच विद्यार्थ्यांना ‘Excellent Award’ मिळाला आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कर्मयोगी विद्यानिकेतन विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि दर्जेदार शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई, सर्व शिक्षकवृंद व पालकांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये व्याख्यान..

संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र. पंढरपूर : श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या सहाव्या…

3 weeks ago