ताज्याघडामोडी

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “मॉडर्न सिमॉस व्हीएलएसआय डिझाईन” कार्यशाळेचे आयोजन

कोर्टी, पंढरपूर (दि. २९ जून २०२६):
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभाग आणि आयईटीई स्टुडंट्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने “मॉडर्न सिमॉस डिझाईन फ्रॉम प्रोसेस टेक्नॉलॉजी टू डिजिटल बिल्डिंग ब्लॉक्स” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांनी दिली

या कार्यशाळेसाठी डॉ. धर्मेंद्र गणगे ( असिस्टंट प्रोफेसर ,पुणे) हे प्रमुख मार्गदर्शक ( रिसोर्स पर्सन) म्हणून उपस्थित होते. त्यांनी सिमॉस फॅब्रिकेशन प्रक्रिया, मॉस लेयर्स, स्टिक डायग्राम, लॅम्ब्डा-आधारित डिझाईन, सिमॉस प्रोसेस फ्लो तसेच डिजिटल बिल्डिंग ब्लॉक्स या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि व्ही एल एस आय डिझाईनमधील नव्या प्रवाहांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
या कार्यशाळेत तृतीय वर्ष व अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक शंकांचे निरसन करून मौल्यवान ज्ञान संपादन केले.

कार्यक्रमाचे आयोजन कार्यशाळा समन्वयक डॉ. अंजली पिसे यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. अल्ताफ मुलाणी (विभागप्रमुख), डॉ. स्वानंद कुलकर्णी (उपप्राचार्य) आणि डॉ. कैलाश करांडे (प्राचार्य) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील कु. वैष्णवी पवार आणि कु. निलोफर शेख यांनी उत्कृष्टरीत्या केले. कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सिमॉस व्हीएलएसआय डिझाईन, सेमीकंडक्टर प्रक्रिया तंत्रज्ञान आणि डिजिटल सर्किट डिझाईन याबाबत सखोल माहिती मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. कैलाश करांडे (प्राचार्य) यांनी कार्यशाळेचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी अशा तांत्रिक कार्यशाळांचा लाभ घेऊन आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे, तसेच अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचा निकालाचा चढता आलेख कायम

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न; नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज,…

7 days ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 month ago