ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेतून योग दिन साजरा.
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि २०२६ च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची अधिकृत थीम निरोगी वृद्धत्वासाठी योग यानुसार कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व वृक्षारोपणाने करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी हार्दिक योग साधना पंढरपूरच्या योग प्रशिक्षिका सौ. प्रिया विभुते यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा आणि श्वसनक्रियांचे प्रात्यक्षिक करून त्यांचे वैज्ञानिक महत्त्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना समजावून सांगितले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील तसेच कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. स्वप्निल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करून निरोगी भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमामध्ये कर्मयोगी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे सर्व प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध विभागांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मयोगी पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके तसेच कर्मयोगी शैक्षणिक संकुल मधील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता, विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागाचे प्रमुख गणेश बागल तसेच श्री. षण्मुखानंद माशाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विकास वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. नवनाथ कारंडे यांनी केले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचा निकालाचा चढता आलेख कायम

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न; नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज,…

7 days ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 month ago