आ.समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याने मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबीयांना मिळाला आर्थिक आधार
काही दिवसांपूर्वी माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी परिसरात पंढरपूर-सातारा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात पिकअप वाहन विहिरीत कोसळून पंढरपूर तालुक्यातील एकाच कुटुंबातील आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली होती.
सदर घटनेनंतर आमदार समाधान आवताडे यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करून शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अपघातग्रस्त कुटुंबीयांसाठी ४० लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इंदुबाई दशरथ बावचे, पूजा अमोल सातूरे, पूजा बालाजी बावचे, अश्विनी संदीप बावचे, संस्कार संदीप बावचे, संस्कृती संदीप बावचे, भारत अमोल सातूरे आणि समर्थ बालाजी बावचे यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे एकूण ४० लाख रुपयांची आर्थिक मदत आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते देण्यात आली.
याप्रसंगी युवक नेते प्रणव परिचारक, द्रोणाचार्य हाके, नगरसेवक राहुल शिंदे नाईक, रोहित पानकर, तमीम मुजावर उपस्थित होते.
सदरची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर करण्यात आली असून सोलापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या मार्फत प्राप्त झालेला मदतीचा धनादेश संबंधित कुटुंबीयांना आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
याबाबत आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे अवघ्या काही दिवसांतच अपघातग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
शासनाकडून मिळालेली ही मदत दुःख कमी करू शकत नसली तरी संकटग्रस्त कुटुंबीयांना काही प्रमाणात आधार देणारी ठरणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज,…
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…