ताज्याघडामोडी

एसकेएन सिंहगडच्या विद्यार्थिनीचे जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश

कु. सोनिया नवले यांची अमेरिकेतील जागतिक कीर्तीच्या इलिनॉईस विद्यापीठातून एम.एस. पदवी संपादन

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूरच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाच्या गुणवंत माजी विद्यार्थिनी कु. सोनिया दादासाहेब नवले यांनी अमेरिकेतील जागतिक कीर्तीच्या युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉईस अर्बना-चॅम्पेन येथून मास्टर ऑफ सायन्स (M.S.) इन इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट ही पदवी यशस्वीरित्या संपादन करून सिंहगड परिवाराच्या शैक्षणिक वैभवात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे महाविद्यालय, पंढरपूर परिसर तसेच संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील एखतपूर येथील रहिवासी असलेल्या कु. सोनिया नवले यांनी एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्कृष्ट गुणवत्तेसह पूर्ण केली. अभियांत्रिकी शिक्षणादरम्यान त्यांनी सातत्यपूर्ण शैक्षणिक प्राविण्य राखत विविध तांत्रिक उपक्रम, प्रकल्प आणि कौशल्यविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदविली.
त्यां

च्या उल्लेखनीय गुणवत्तेच्या जोरावर त्यांना टेक महिंद्रा आणि ॲमेझॉनसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटची संधी प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये दोन वर्षे कार्यरत राहून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक अनुभव संपादन केला. त्यांच्या मेहनतीची, अभ्यासू वृत्तीची आणि प्रगल्भ विचारसरणीची दखल उद्योगविश्वातही घेण्यात आली, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.
उच्च शिक्षणाच्या ध्यासातून आणि जागतिक स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या जिद्दीने प्रेरित होऊन त्या २०२४ मध्ये अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी रवाना झाल्या. कठोर परिश्रम, समर्पण आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर त्यांनी मे २०२६ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉईस अर्बना-चॅम्पेन या जागतिक दर्जाच्या विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स इन इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली.

कु. सोनिया नवले यांच्या या अभूतपूर्व यशामुळे एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीची, विद्यार्थीकेंद्रित दृष्टीकोनाची आणि सक्षम शैक्षणिक मार्गदर्शनाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही जागतिक स्तरावर यश संपादन करण्याची क्षमता असून योग्य दिशा, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर आंतरराष्ट्रीय पातळीवरही उल्लेखनीय यश मिळविता येते, हे कु. सोनिया नवले यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखविले आहे.

त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. या यशामागे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांचे वडील श्री. दादासाहेब नवले आणि आई सौ. स्मिता दादासाहेब नवले, प्राचार्या, सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी, पंढरपूर यांचे संस्कार, प्रेरणा आणि सातत्यपूर्ण पाठबळ लाभल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कु. सोनिया सोमनाथ नवले यांचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, सिंहगड परिवाराच्या शैक्षणिक परंपरेला जागतिक स्तरावर नवे अधिष्ठान प्राप्त करून देणारे आहे.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचा निकालाचा चढता आलेख कायम

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न; नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज,…

7 days ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 month ago