Categories: Uncategorized

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम.

प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग पंढरपूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित करून उज्जल यशाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाचा यावर्षीचा प्रथम वर्ष चा निकाल ८७% टक्के लागला असून हा निकाल जिल्ह्या अव्वल आहे. यामध्ये प्रथम क्रमांक अंजली जयप्रकाश पटेल (८०%), व्दितीय क्रमांक मुंढे शिवगंगा गणपत (७८.४०%) तर तृतीय क्रमांक राजनंदिनी नागनाथ गायकवाड (७६.८०%) यांनी मिळवला आहे.
महाविद्यालयाचे शिस्तबद्ध वातावरण, नियमित शिक्षणप्रणाली व अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या विशेष मार्गदर्शनामुळे हे घवघवीत यश मिळाले आहे असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. तसेच आपल्या पाल्यांचे या महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचे सार्थक झाले अशी भावना यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केली. बी.एस्सी नर्सिंग महाविद्यालयाचे हे दुसरेच वर्ष असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केली आहे
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे प्रा. गुरुराज कुलकर्णी, कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील , पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके, वर्गशिक्षक प्रा.सोमेश निकम तसेच सर्व प्राध्यापकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये व्याख्यान..

संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र. पंढरपूर : श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या सहाव्या…

3 weeks ago